मराठा आरक्षणाचे पहिले ‘लाभार्थी’ बनलेल्यांच्या ‘सा.बां.’ विभागाकडून नियुक्त्या जाहिर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतर आता १३ टक्के आरक्षणानुसार नोकऱ्यांमध्ये नियुक्त्या करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब मध्ये कनिष्ठ आभियंता संवर्गातील रिक्त पदांसाठी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात मराठा समाजातील ३४ जणांच्या एसईबीसी प्रवर्गातील १३ टक्के कोट्यातून नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम विभाग हा एसईबीसी आरक्षणाची राज्यात अमंलबजावणी करणारा राज्यातील सर्वात पहिला विभाग ठरला आहे.

मराठा समाज आरक्षण कायदा नोव्हेंबर २०१७ साली लागू झाल्यानंतर राज्य शासनाने हा महाभरतीचा निर्णय घेतला. या महाभरतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ आभियंता या पदांच्या जागांच्या भरती साठी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधित निर्णय देताना नोकऱ्यामध्ये एसईवबीसीला १३ टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला होता. त्याच आधार आता राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागात ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबण्यात आली होती. यासाठी परिक्षा देखील घेण्यात आली होती. या परिक्षांचा निकाल लागल्यानंतर ३०० पदांसाठीचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील ३४ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात मराठा सामाजासाठी आरक्षण लागू झाल्यानंतर भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये इतर रिक्त पदे देखील एसईबीसी प्रवर्गात भरण्यात येण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

You might also like