Maha Board 10th Result | 10 वी चा निकाल याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maha Board 10th Result | यावर्षी देखील एसएससी बोर्डाचे निकाल वेळेतच (MH board exam results dates) लागणार आहेत. 12 वीचा निकाल मागील आठवड्यात लागला, आता या आठवड्याात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maha Board 10th Result)

 

यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही (Maharashtra state board exams Result) उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती. मात्र

 

महाराष्ट्र बोर्डाची 10 वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे. शिक्षक सध्या त्यांच्या निकालाच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे मानले जात आहे. निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करण्यात येतात. त्यानंतर निकाल ऑनलाईन अपलोड केला जातो. (Maha Board 10th Result)

 

10 वीचा निकाल लागण्यापूर्वीच 11वी, पॉलीटेक्नीक आणि इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यामुळे निकालापूर्वीच यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया करावी लागणार आहे. निकाल लागल्यानंतर या प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होईल. या प्रक्रियेसाठी लागणार्‍या कागदपत्रांची तयारी आतापासून करावी लागेल.

 

10 वीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर आणि कसा पाहता येईल ते जाणून घेवूयात…

1. mahresult.nic.in
2. maharashtraeducation.com
3. mahahsscboard.maharashtra.gov.in.
4. sscresult.mkcl.org

 

असा जाणून घ्या निकाल
10 वी स्टेट बोर्डाचा निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

– आता एसएससी परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.

– यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाका. नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. निकाल समोर असेल. यानंतर माहितीसाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करा.

 

Web Title :- Maha Board 10th Result | maharashtra state board 10th exams results 2022 how to check mh board 10th result 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा