अर्थसंकल्प ट्विटरवरून फुटला, विरोधकांचा आरोप ; मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला गेला. मात्र हा अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हा सभागृहाचा आणि सदस्यांचा अवमान असल्याचा आरोप करत विरोधकांनी अर्थसंकल्प सुरु असतानाच सभात्याग करून निषेध व्यक्त केला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून अर्थसंकल्प फूटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा सभागृहाचा अवमान आहे. आमच्या काळात कधीही असं झालं नव्हतं. सरकारने सभागृहाची माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी केली आहे. तर विधारपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील अशीच मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. जबाबदारीच्या पदावर काम करताना अशाप्रकारे अर्थसंकल्प फोडणे योग्य नाही. एकीकडे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत होते आणि दुसरीकडे ट्विटरवरून अर्थसंकल्प जाहिरातींसह सादर केला जात होता. सरकारने सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण सुरु असताना अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या प्रति दाखवत सभागृहात आक्षेप नोंदविला.

मुख्यमंत्र्यांनी आरोपाचे केले खंडन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. सभागृहात दोन वाजता अर्थसंकल्प सादर करायला सुरवात केली. या अर्थसंकल्पाच्या संदर्भात पहिले ट्विट २ वाजून १६ मिनिटांनी पडल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. अर्थसंकल्प फुटलेला नाही, हे मुख्यमंत्र्यानी ठामपणे सांगितले आणि आरोपाची खंडन केले.

सिनेजगत

सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची तारीख पुन्हा ‘चेंज’, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार

‘दबंग’ सलमान खानचा ‘हा’ व्हिडीओ प्रचंड ‘व्हायरल’  

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

 आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

 जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

 पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना