Maha govt launches Suvidha Kendra | धारावीमध्ये देशातील सर्वात मोठे सुविधा केंद्र ! 50 हजार लोकांना एकाच वेळी आंघोळ करण्याची सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maha govt launches Suvidha Kendra | धारावी (Dharavi) मध्ये बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या सुविधा केंद्राचे (Suvidha Centre) उद्घाटन महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. ग्राउंड प्लस दुमजली सार्वजनिक सुविधा केंद्राने 50 हजारांहून अधिक रहिवाशांसाठी आंघोळीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पिण्यासाठी आरओ फिल्टर पाणी, कपडे धुण्यासाठी लाँड्री सुविधाही आहे. (Maha govt launches Suvidha Kendra)

 

येथे 111 सीटर टॉयलेट बांधण्यात आले आहेत. या सुविधेमध्ये ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि वीज देण्यासाठी सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत.

 

या प्लांटचा एक फायदा म्हणजे येथे वापरण्यात येणारे पाणी रिसायकल करून पुन्हा वापरता येते. यामुळे वर्षाला 90 लाख लिटर शुद्ध पाण्याची बचत होणार आहे. मुंबईतील घाटकोपर, धारावी, चेंबूर, वांद्रे, सांताक्रूझ, गोवंडी येथे बीएमसी अशाच प्रकारे आणखी 10 सुविधा केंद्रे बांधत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. बीएमसीने धारावीमध्ये गेल्या 2 वर्षात 19 सार्वजनिक शौचालये बांधली आहेत ज्यात 800 सीट आहेत. (Maha govt launches Suvidha Kendra)

 

गरम पाण्याचीही सोय असेल
धारावीत उभारण्यात आलेल्या सुविधेत 111 सीटचे शौचालय बांधण्यात आले आहे. येथे स्नानगृहही बांधण्यात आले आहे. येथे गरम पाण्याची सुविधाही मिळणार आहे. धारावीच्या उदंचन केंद्राजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. धारावीच्या नाईक नगर, संग्राम नगर, शताब्दी नगर आदी वसाहतींमधील 5 हजार लोक ते वापरू शकतात, ज्यांच्याकडे अशी सुविधा नाही.

10 आणखी सुविधा केंद्रांसाठी करार
ही सुविधा मेसर्स युनायटेड वे मुंबई, मेसर्स हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindusthan Unilever) आणि HSBC संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इनिशिएटिव्ह अंतर्गत तयार करण्यात आली आहे. मुंबईत अशा आणखी 10 सुविधा केंद्रांसाठी करार करण्यात आला आहे.

 

या भागात उभारण्यात येणार सुविधा केंद्रे

1. जी उत्तर विभाग प्रेम नगर, धारावी

2. जी उत्तर विभाग काला किला, धारावी

3. एन विभाग भीम नगर, घाटकोपर (पश्चिम)

4. एन विभाग साईनाथ नगर, घाटकोपर (पश्चिम)

5. एम पूर्व विभाग टाटा नगर, गोवंडी

6. एम पूर्व विभाग तानाजी मालुसरे मार्ग, गोवंडी

7. एम पूर्व विभाग गायकवाड नगर, चेंबूर

8. एच पूर्व विभाग डवरी नगर, सांताक्रूझ (पूर्व)

9. एच पूर्व विभाग खेरवाडी वांद्रे (पूर्व)

10. एच पूर्व विभाग कुचिकोर्वे नगर, कलिना सांताक्रूझ (पूर्व)

 

 

Web Title :- Maha govt launches Suvidha Kendra | country largest suvidha centre in dharavi 50 thousand people bathing facility together

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hinganghat Burning Case | हिंगणघाट जळीत प्रकरणात दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

 

Pune Crime | बिबवेवाडीत युवकावर गोळीबार करुन जंगलात लपलेल्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 6 जणांना अटक

 

Multibagger Chemical Stock | 2 दिवसात 36% वाढला ‘हा’ शेयर, शंकर शर्मा यांच्या बल्क डीलने चमक वाढली का ?