Maha Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिस नवाब मलिकांचा जबाब नोंदवणार, न्यायालयाची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maha Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याची परवानगी मुंबई पोलिसांना न्यायालयाकडून मिळाली आहे. या प्रकरणी मलिक (Nawab Malik) यांच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मुंबई पोलिसांनी कोर्टात विनंती अर्ज केला होता. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग करत गोपनीय अहवाल लीक केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. (Maha Phone Tapping Case)

 

आता याप्रकरणी नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीने मनी लाँड्रिंग गैरव्यवहार प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात अटक केल्याने ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या न्यायालयाच्या परवानगीने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

 

फोन टॅप केल्याचा अंमलदाराचा जबाब
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी 700 पानी अहवाल दाखल केला आहे. यात 20 शासकीय अधिकार्‍यांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये एका अंमलदाराचा समावेश असून तो अंमलदार 2019 मध्ये राज्य गुप्तचर विभागात कार्यरत होता. (Maha Phone Tapping Case)

या अंमलदाराने त्याच्या जबाबात सांगितले आहे की, संजय राऊत साहेब कोणाशी बोलायचे यावर खास लक्ष देण्याचा आदेश होता.
याचा रिपोर्ट वरिष्ठांना द्यावा लागत होता. फोन टॅपिंग करणार्‍या या टीममध्ये दोन बड्या अधिकार्‍यांसह 11 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता.
महत्त्वाचे म्हणजे हे फोन टॅपिंग प्रकरण वैध्य आहे की अवैध्य हे माहित नव्हते असे या अंमलदाराने जबाबात म्हटले आहे.

 

संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी 16 मार्च 2022 रोजी दोन तास रश्मी शुल्का यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला होता.
रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

 

Web Title :- Maha Phone Tapping Case | maharashtra phone tapping case nawab malik s statement will be recorded by cyber cell mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best Stocks | घसरणार्‍या बाजारात आता खरेदी करू शकता ‘हे’ 5 शेअर, लखपतीला करोडपती बनवण्याची ताकद !

 

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून, मृतदेह फेकला निरा नदीत; 5 संशयित ताब्यात

 

Maharashtra Monsoon 2022 Update | मान्सूनची राज्यात विश्रांती, जोरदार सलामीनंतर झाले तरी काय ?