Maha Prabodhan Yatra | ‘शकुनीमामाचा बीडमध्ये FLOP शो !!’, ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची भाजप आमदाराने उडवली खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी ठाकरे गटाची (Thackeray Group) महाप्रबोधन यात्रा (Maha Prabodhan Yatra) बीडमध्ये पार पडली. या सभेवरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. बीडमध्ये झालेल्या सभेला ठाकरे गटाचे किती लोक होते असा सवाल त्यांनी केला. तसेच ‘शकुनीमामाचा बीडमध्ये FLOP शो!!’ म्हणत महाप्रबोधन यात्रेची (Maha Prabodhan Yatra) खिल्ली उडवली आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) मोठा गौप्यस्फोट केला आहे.

 

 

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. बीडमध्ये झालेल्या कालच्या सभेत (Maha Prabodhan Yatra) ठाकरे गटाचे किती लोक होते? ही सभा ठाकरे गटाची होती की राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) होती हे त्यांनी सांगावं. सभेला पाचची वेळ दिली होती. सभा आठला सुरु झाली. रॅलीमध्येही सर्व राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते होते. अर्ध्या खुर्चा रिकाम्या दिसल्यानंतर राष्ट्रवादीला फोन करुन विनंती केली, असा टोला राणे यांनी लगावला.

यावळी बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) बनायचे होते म्हणून युतीची सत्ता गेली.
हे खरं आहे की नाही हे संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) सांगावं असं राणे यांनी म्हटलं.

 

 

 

Web Title :  Maha Prabodhan Yatra | nitesh rane strongly criticizes uddhav thackeray and sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा