यंदाच्या महाशिवरात्रीला 117 वर्षानंतर बनतोय अद्भुत ‘संयोग’, नकळत देखील करू नका ‘या’ 7 चूका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिष शास्त्रात तीन रात्री केलेली विशेष साधना महत्वाची मानली जाते. शरद पोर्णिमेला मोहरात्री, दिपावलीला कालरात्री आणि महाशिवरात्री या तीन रात्री अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात. महाशिवरात्री फाल्गुन मासच्या कृष्ण पक्षच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. 21 फेब्रुवारी शुक्रवारी म्हणजे उद्या महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. ज्योतिष नुसार यंदा सर्वार्थ सिद्ध योग महाशिवरात्रीला येत आहे. 117 वर्षानंतर हा योग महाशिवरात्रीला येत आहे.

या महाशिवरात्रीला शनि स्वत: मकर राशीत आहे तर शुक्र आपली उच्च रास असलेल्या मीन राशीत आहे. हा एक दुर्लभ योग आहे. या योग महादेव आणि पार्वतींच्या श्रेष्ठ पूजेवेळी आला आहे. महाशिवरात्रीला पुराण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीसाठी अनेक नियम सांगितले जातात. जर व्रतादरम्यान तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर महादेवाची कृपा तुमच्यावर होणार नाही. त्यामुळे महाशिवरात्रीला अशी काही कामे आहेत जी करणं टाळलं पाहिजे.

हा आहे महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त –
21 फेब्रुवारी 2020 ची संध्याकाळ 5 वाजून 16 मिनिटांपासून महाशिवरात्रीचा योग सुरु होत आहे आणि 22 फेब्रुवारी शनिवारपर्यंत संध्याकाळी 7 वाजून 9 वाजेपर्यंत हा योग आहे. माहिन्याला करण्यात येणारे शिवरात्रीचे व्रत जे करु इच्छित आहेत ते या महाशिवरात्रीपासून सुरु करु शकतात.

चुकूनही करु नका या गोष्टी –
1. शंख जल – शंखचूड नावाच्या एका असूराला महादेवाने मारले होते. त्याच्या असूराचे प्रतिक शंख मानला जातो. जो भगवान विष्णुंचा भक्त होता यामुळे शंकाने भगवान विष्णुंची पूजा होते शंकराची नाही.

2. फुल – केसर, दुपहरिका, मालती, चंपा, कुंद, जुही इत्यादी फूल भगवान शंकराला अर्पण केली जात नाही.

3. चिपळी – भगवान शिवशंकराच्या पूजा दरम्यान चिपळी वापरली जात नाही.

4. तुळशी पत्र – तुळशीचा जन्म जलंधर नावाच्या असूराच्या पत्नीच्या वृंदाच्या अंशातून झाला. तिलाच पत्नीच्या रुपात भगवान विष्णुंनी स्वीकारले. यामुळे महादेवाची पूजा तुळशीने केली जात नाही.

5. तीळ – मानले जाते की भगवान विष्णुच्या मळातून तीळाची उत्पती झाली यामुळे हे महादेवाला अर्पित केले जात नाही.

6. तांदळाचे तुकडे – मान्यता आहे की अक्षता भगवान शंकराला अर्पण केली जाते. तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध मानले जातात. त्यामुळे असे तांदूळ शिवपुजेला वापरले जात नाहीत.

7. कुंकू – कुंकू सौभाग्याचे प्रतिक मानले जाते, परंतु महादेव वैरागी मानले जातात. त्यामुळे शंकराला कुंकू आर्पित केला जात नाही.