यंदाच्या महाशिवरात्रीला ‘या’ 5 राशींच्या लोकांवर होईल महादेवाची ‘कृपा’, होणार ‘लाभ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असे मानले जाते ती शिवरात्रीला पूजा करणं लाभदायक ठरतं, असे म्हणतात महादेवाची पूजा अर्चना केल्यास मनोकामना पूर्ण होते आणि जीवन समृद्ध होते. या महाशिवरात्रीला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय आहेत. यंदा 21 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाईल.

या महाशिवरात्रीला काही खास राशीवर भोलेनाथाची विशेष कृपा होईल. त्यामुळे या महाशिवरात्रीला कोणत्या कोणत्या राशीला काय काय लाभ होणार हे जाणून घेऊयात.

मेष रास – या राशीवर महादेवाची कृपा असेल. सध्या मेष राशीला त्यांचे भाग्य साथ देत आहे. या राशीच्या जीवनात घर खरेदीचा योग आहे. मुलांमुळे पद, प्रतिष्ठेत वाढ होईल. आरोग्य देखील सुदृढ असेल.

वृषभ रास – जे व्यापार करतात त्यांना यंदा लाभ होईल. धनयोग आहे. प्रवासचा योग आहे. समाज्यात प्रतिष्ठा वाढेल. कमाईचे नवे मार्ग खुले होतील. जर तुमच्याकडे कोणी मित्र काम घेऊन आला तर त्याला लाभ होईल. नकारात्मक लोकांपासून दूर रहा. महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

सिंह रास – कामात प्रगती होईल. आत्मबळ प्रबळ होईल. कुटूंब सुखी राहिलं. आई आणि पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. पत्नीशी वाद घालू नका. कामात लाभ होईल. सप्तश्रीचे पठन करा. नव्या कार्याचा प्रारंभ करा.

तुळ रास – महाशिवरात्रीला अनेक चांगले परिणाम मिळतील. जमीन खरेदीसाठी चांगला योग आहे. शिवलिंगावर दही चढवा.

मीन रास – प्रवासाचा आणि धन योग आहे. वाहन, जमीन तसेच विविध सुख समृद्धीच्या वस्तू खरेदी करु शकतात. न्यायालयात निर्णय तुमच्या बाजूने लागेल. ज्या दिशेने वाटचाल करत आहात ती कायम ठेवा, विकास निश्चित आहे.

शिवरात्रीला या वस्तूचा वापर टाळा –
महादेवाची पूजा करताना केसर, दुर्वा, मालती, चंपा, चमेली. कुंद, जुही इत्यादी अर्पण करु नये. भांग आणि धतूऱ्यांच्या फूलाचा वापर करावा.
भगवान शिवशंकराच्या पूजा दरम्यान चिपळी वापरली जात नाही.
तुळशीचा जन्म जलंधर नावाच्या असूराच्या पत्नीच्या म्हणजे वृंदाच्या अंशातून झाला. तिलाच पत्नीच्या रुपात भगवान विष्णुंनी स्वीकारले. यामुळे महादेवाची पूजा तुळशीने केली जात नाही.
मानले जाते की भगवान विष्णुच्या मळातून तीळाची उत्पती झाली यामुळे हे महादेवाला अर्पित केले जात नाही.
मान्यता आहे की अक्षता भगवान शंकराला अर्पण केली जाते. तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध मानले जातात. त्यामुळे असे तांदूळ शिवपुजेला वापरले जात नाहीत.