महाशिवरात्री 2020 : महादेवानं माता पार्वतीला सांगितले होते ‘हे’ 5 रहस्य, आनंदी जीवनाचे लपलेले ‘मंत्र’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २१ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव पूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. भोळ्या महादेवाचे चमत्कार सर्व भक्तांना माहित आहेतच, परंतु अशी देखील काही रहस्ये आहेत जी त्यांनी माता पार्वतींना सांगितली होती. ती रहस्य आपल्याला माहित नसतील तर जाणून घेऊया त्या रहस्यांबद्दल. भगवान शिव शंकरांनी पार्वती मातेला जे धडे शिकविले ते मानवी जीवन, कौटुंबिक आणि विवाहित जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत. भगवान शिव यांनी पार्वती मातेला अशी ५ चमत्कारी रहस्ये सांगितली आहेत, त्यांना समजून घेतले तर आपले आयुष्य देखील बदलू शकते.

शिव प्रकाश नाही किंवा अंधकारही नाही. तो शून्य आहे आणि पदार्थ देखील आहे. तो संपूर्ण विश्व आहे. तो शक्तीचा उगम आहे. तो शक्तीचा भाग आहे आणि स्वतः शक्ती देखील आहे. शिव पुराणानुसार शिव-शक्तीचे संयोजन म्हणजेच परमात्मा आहे.

शिव पुराणानुसार पार्वती माता सतीचा अवतार आहे. राजा हिमावत आणि राणी मैना यांची मुलगी पार्वती लहानपणापासूनच शिवभक्त होती. माता पार्वतीच्या जन्माच्या वेळी नारद मुनीने भाकीत केले होते की ती भगवान शिव शंकराशीच लग्न करणार. जसजसे ती मोठी होत गेली तसतसे पार्वतीची शिव शंकराप्रती श्रद्धा वाढतच गेली. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर आणि अनेक अडथळ्यांना पार करून शिव आणि पार्वतीचे अखेर लग्न झाले.

सर्वात मोठा गुण आणि सर्वात मोठे पाप

एका वेळेस पार्वती मातेने भगवान शिव यांना विचारले की मानवाचा सर्वात मोठा गुण कोणता आहे? मानव सर्वात मोठे पाप कोणते करतो? भगवान शिव ने या प्रश्नाचे उत्तर एका संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून दिले. भगवान शिव म्हणाले की, ‘नास्ति सत्यात् परो नानृतात् पातकं परम्.’ जगात मान-सन्मान मिळवणे आणि नेहमी खरं बोलणे हा सर्वात मोठा गुण आहे. तसेच त्यांनी पार्वती मातेला सांगितले की, या जगात सर्वात मोठे पाप म्हणजे बेईमानी आणि फसवणूक करणे हे आहे. फसवणूक या जगातील सर्वात मोठे पाप आहे जे की मानव करत असतो. मानवाने आपल्या जीवनात नेहमी इमानदार राहिले पाहिजे.

भगवान शिव यांनी पार्वती मातेला सांगितले की मानवाने परिश्रम करता करता स्वत:चे मूल्यमापन देखील केले पाहिजे. मानवाने नेहमीच त्याच्या स्वत:च्या कृती आणि वर्तनावर लक्ष ठेवले पाहिजे. कोणत्याही अशा कामात गुंतू नये जे की नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे.

या तीन गोष्टी कधीही करु नका

भगवान शिव यांनी माता पार्वतीला सांगितले की कोणीही बोलण्यातून, कर्मांनी आणि विचारांच्या माध्यमातून पाप करु नये. म्हणजेच कुणीही पापी कृत्य करु नये आणि विचारांमध्ये व बोलण्यात कोणतीही अपवित्रता असू नये. माणूस जे पेरतो तेच उगवत असते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या जीवनात केलेल्या कृत्यांकडे लक्ष दिले पाहिजे.

यशाचा एक मंत्र

मोह हे सर्व समस्यांचे मूळ आहे. मोह-माया यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत असते. जेव्हा आपण जगाच्या सर्व प्रकारच्या मोह-मायांपासून मुक्त होतात तेव्हा आपल्याला आयुष्यात यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पण हा मोह टाळण्याचा मार्ग कोणता आहे? भगवान शिव यांनी पार्वती मातेला देखील सांगितले. सर्व प्रकारच्या मोह-मायाच्या जाळ्यातून दूर राहण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे मानवी शरीराची क्षणभंगुरता समजून घेणे.

या चमत्कारिक मंत्राने तुमचे जीवन बदलणार

भगवान शिव यांनी पार्वती मातेला सांगितले की मृगजळ हा सर्व दु:खांचा उपाय आहे. मानवाने एकानंतर दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावण्याऐवजी ध्यान करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कर्माच्या चक्रातून आणि शरीराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ध्यान साधना चालू ठेवली पाहिजे.