Maha Shivratri 2021: महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि योग्य विधी

नवी दिल्ली : महाशिवरात्री हिंदू धर्माच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. शिवरात्रीचे पर्व वर्षांत दोनवेळा व्यापक रुपात साजरा केले जाते. एक फाल्गुनच्या महिन्यात तर दुसरा श्रावण महिन्यात आहे. फाल्गुन महिन्यात शिवरात्रीला महाशिवरात्री म्हटले जाते. महाशिवरात्री चतुर्दशीच्या दिवसाला साजरी केली जाते. यावेळी चतुर्दशी 11 मार्चला आहे. महाशिवरात्री या दिवसाला साजरी केली जाते.

शिवरात्रीदरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, अशी मान्यता आहे. भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक उपाय केले जातात. याच दिवशी शिवजीला 3 पानांची 108 बेलपत्र अर्पण केले जातात. शंकर भगवानला भांग आवडते. त्यामुळे या दिवसी भांगमध्ये दूध मिसळून शिवलिंगवर अर्पण करावे.

महाशिवरात्रीचा शुभमुहूर्त काय?

– निशीथ काल पूजेचा वेळ – 11 मार्च, रात्री 12 वाजून 6 मिनिटांपासून 12 वाजून 55 मिनिटांपर्यंत

– पहिला प्रहर – 11 मार्च, सायंकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून 9 वाजून 29 मिनिटांपर्यंत.

– दूसरा प्रहर – रात्री 9 वाजून 29 मिनिटांपासून 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत.

– तिसरा प्रहर- रात्री 12 वाजून 31 मिनिटांपासून 3 वाजून 32 मिनिटांपर्यंत.

– चौथा प्रहर- 12 मार्च, सकाळी 3 वाजून 32 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 34 मिनिटांपर्यंत.

– महाशिवरात्री पारणा मुहूर्त- 12 मार्च, सकाळी 6 वाजून 36 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 4 मि…

महाशिवरात्रीची पूजा विधी

शिवरात्रीला भगवान शंकरला पंचामृतने स्नान करून करावे. केसरच्या 8 लोटेने जल अर्पण करावे. संपूर्ण रात्री दिवा लावावा. चंदनचा टिळा लावावा. बेलपत्र, भांग, धतुरा, ऊसाचा रस, तुळसी, जायफळ, कमल गट्टे, फळ, मिष्ठान, गोड पान, इत्र व दक्षिणा अर्पण करावी. त्यानंतर केसरयुक्त खीरचा भोग द्यावा. प्रसाद द्यावा. ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय रूद्राय् शम्भवाय् भवानीपतये नमो नमः मंत्राचा जप करावा. रात्री जागरण केले जाते.