सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय होणार ६० वर्षे ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने आश्वासनांची खैरात केली आहे. राज्य सरकार शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आज सोमवारी (१५ जुलै) रोजी राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले आहे.

राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक असून मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज मंत्रालयात महासंघाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्राप्रमाणे राज्यात ५ दिवसांचा आठवडा करणे, वेतनत्रुटींबाबत बक्षी समितीचा दुसरा अहवाल तत्काळ सादर करणे, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते मिळणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी २ वर्षांची बालसंगोपन रजा, प्रशंसनिय कामाबद्दल आगावू वेतनवाढ देणे, अधिकाऱ्यांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुविधा लागू करणे, अशा विविध १८ मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

आरोग्यविषयक वृत्त

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

 

Loading...
You might also like