Maha TET Scam | टी.ई.टी. परीक्षा घोटाळ्यात डॉ. प्रितिष देशमुख यास जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maha TET Scam | सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात जी.ए. सॉफ्टवेअर (GA Software Technologies) कंपनीचे संचालक प्रितिष दिलीपराव देशमुख (GA Software Director Dr. Pritish Deshmukh) यास पुणे सत्र न्यायालयाने (Pune Session Court) जामिनावर मुक्त केले आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. ए. पत्रावळे ( Sessions Judge Mrs. V. A. Patravale) यांनी हा निर्णय दिलेला आहे. (Maha TET Scam)

 

या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी कि, सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षक भरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचे संचालनाचे काम हे जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस देण्यात आले होते व सदर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून अपात्र उमेदवारास पात्र म्हणून घोषित करून तसा निकाल जाहीर केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणाची उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी पुणे सायबर पोलीस स्टेशन (Pune Cyber Police Station) येथे सदर बाबत फिर्याद दिली होती. या प्रकरणात संचालक प्रितिष देशमुख यास दिनांक २२/१२/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती व आरोपी याने त्याचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे (Adv Vijaysinh Thombare) यांचे मार्फत न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. (Maha TET Scam)

सदर प्रकरणात पोलिसांनी (Pune Cyber Police) केलेला तपास पूर्ण झालेला असून दोषारोप पत्र सुद्धा दाखल करण्यात आले आहे. तसेच उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) यापूर्वी घेतलेल्या दखली मध्ये प्रस्तुत प्रकरणात आरोपींची आपापसात भेट हे संगनमत होत नाही असे नमूद केले होते. तसेच, संचालक आरोपी हा सदर घोटाळा करते वेळी कंपनीत कार्यरत नव्हता व त्यास चुकीच्या पद्धतीने संचालक असे दाखविण्यात आले असल्याची बाब आरोपीतर्फे ॲड विजय ठोंबरे यांनी मांडली. तसेच, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक प्रकरणातील दाखले देत Bail is rule and jail is exception असा युक्तिवाद आरोपीतर्फे मांडण्यात आला. सदर प्रकरणात आरोपी व अभियोग पक्षाची बाजू लक्षात घेत मे. सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. ए. पत्रावळे यांनी संचालक प्रीतेश देशमुख याची रक्कम रु. ५०,०००/- रक्कम रुपयाचे जातमुचलक्यावर सुटका केलेली आहे. तसेच त्यावर देशाबाहेर न जाण्याची व पुराव्यात छेडछाड न करण्याची व इतर बंधने लादण्यात आलेली आहे. (Pune Police)

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड विजयसिंह ठोंबरे, ॲड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे, ॲड. आशुतोष शेळके यांनी काम पाहिले. तसेच विष्णु होगे यांनी सहाय्य केले.

Web Title : Maha TET Scam | GA Software Director Dr. Pritish Deshmukh Bail Pune Session Court Pune Cyber Police Maha TET Scam Adv Vijaysinh Thombare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन