Maha Vikas Aghadi | ‘न भूतो ना भविष्यती’ असा हल्लाबोल मोर्चा काढणार – उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून गुरुवारी महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) मित्र पक्षांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वांनी भाजप आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा सातत्याने अपमान केला जात असून, या महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात 17 डिसेंबरला न भूतो ना भविष्यती असा हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Maha Vikas Aghadi) यांनी यावेळी केली.

तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांची छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले यांच्याविषयी बेताल वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रद्रोही विधाने, त्यांची दादागिरी, सीमाप्रश्नी इतर राज्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांच्या कटकारस्थानास राज्य सरकारची फूस असणे, सत्ताधारी नेत्यांची महिला व अन्य नेत्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये तसेच महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेणे आदी मुद्यांच्या विरोधात या मोर्चाचे (Maha Vikas Aghadi) आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान केला जात आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्राची गावे पळवली जात आहेत. त्यामुळे हा महाराष्ट्रद्रोह आहे. त्यांच्या विरोधात आम्ही 17 डिसेंबरला एकजूट करणार, असे यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या काळात निर्णय घेतला गेला. मात्र, त्यात कर्नाटक बँकेचे नाव नव्हते.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत.
त्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या कर्नाटकला व्यवसाय दिला आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागला असून,
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून त्याविरोधात आता येत्या 17 डिसेंबर रोजी भायखळ्यातील जिजामाता उद्यान
ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Web Title :- Maha Vikas Aghadi | maharashtra karnataka border dispute mahavikas aghadi uddhav thackeray ajit pawar nana patole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

New WhatsApp Feature-Meta | मेटाची नवी घोषणा व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना मिळणार हे नवीन फीचर

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना