Maha Vikas Aghadi | शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसचं सरकार कसं बनलं : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अस्तित्वात नेमक कस आल असा आजही अनेकांना प्रश्न पडला आहे. अनेकांनी या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते अद्याप मिळाले नाही. मात्र आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच यावर भाष्य केलं असून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi ) सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र कसे आले यामागील गुपित एका वृत्तवाहिनीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या मुलाखतीत उलगडले आहे.

यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.
शरद पवार म्हणाले, भाजपसोबत शिवसेना सरकार स्थापन करणार नसल्याचे लक्षात येताच आम्ही शिवसेनेबरोबर चर्चा सुरु केली.
यामध्ये संजय राऊत यांची भूमिका महत्वाची होती.
सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. भाजप-शिवसेना युती होणार नसल्याचे स्पष्ट होताच आम्ही सर्वानी शिवसेनेबरोबर जाण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने बोलणी झाली.
काँग्रेसमधील काही नेत्यांनी याला दुजोरा दिला.
त्यानंतर सर्वांनी तयार केलेल्या फॉर्म्युल्यास सोनिया गांधी यांनीही होकार दिला.
अन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गुणांचं कौतुक करताना बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.
मुलाखतीत प्रशांत किशोर यांच्याबद्दलच्याही प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले.
मला प्रशांत किशोर यांची मदत घेण्याची गरज नाही.
सत्तेत बसण्याचीही सध्या मला कुठली महत्त्वाकांक्षा नाही.
पण विरोधी पक्षांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे स्पष्ट केले.

काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखा

काँग्रेसच्या सद्यस्थितीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी उत्तर प्रदेशचं उदाहरण देत किस्सा सांगितला. जुन्या जमिनदारासारखी सध्या काँग्रेस झाली आहे.
जमीनदारांकडील जमिनी कमाल जमीन धारण कायदा आल्यानंतर गेल्या.
रोज सकाळी हवेलीच्या बाहेर आल्यावर ते म्हणतात, ही सगळी जमीन आपली होती.
हवेलीचा खर्च करण्याची शक्ती आता त्यांच्यात राहीलेली नाही.
आता त्यांना जुळवून घ्यावं लागेल.

 

‘ईडीमुळे सरकार आणखी भक्कम’

ईडीच्या कारवायांवर शरद पवार यांनी चौफेर टीका केली.
आकस बुद्धीने ईडीच्या कारवाया सुरू आहेत.
या कारवायांमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार आणखी भक्कम बनेल.
त्यामुळे सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही, असंही पवार यांनी सांगितले.

 

Web Title : Maha Vikas Aghadi | sharad pawar on how mva government was formed in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ; जाणुन घ्या आजचे दर

CM Vijay Rupani Resigns | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

Nagpur News | दुर्देवी ! मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी