Maha Vikas Aghadi | बीडनंतर ‘या’ जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेनेने दिला थेट ‘पालकमंत्री हटाव’ चा नारा

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Maha Vikas Aghadi | काही दिवसांपूर्वी बीडमध्ये (Beed) विकास कामाच्या उद्घाटनावरुन शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) आमने सामने आले होते. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमापूर्वी शिवसैनिकांनी बॅनरबाजी करत काळे झेंडे (Black Flags) दाखवले होते. त्यामुळे बीडमध्ये महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर आता रायगडमध्ये (Raigad) देखील हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. शिवसैनिकांनी थेट रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे (Guardian Minister Aditi Tatkare) यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पालकमंत्री हटावचा नारा दिला आहे.

 

रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी (Alibag MLA Mahendra Dalvi), खालापुरचे आमदार महेंद्र थोरवे (Khalapur MLA Mahendra Thorve) यांच्या वतीने महाडचे आमदार भरत गोगावले (Mahad MLA Bharat Gogavale) यांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पालकमंत्री आदिती तटकरे या मनमानी करीत असल्याचा आरोप गोगावले यांनी केला आहे.

 

विविध विकास कामांचे श्रेय घेण्यापासून नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीदरम्यान (Nagar Panchayat Election) राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगत पालकमंत्री कोणीही चालेल परंतु आदिती तटकरे नको असा पवित्रा गोगावले यांनी रायगड शिवसेनेच्या (Raigad Shiv Sena) वतीने घेतला आहे. त्यामुळे बीड प्रमाणेच रायगड मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद पेटला आहे.

बीडमध्ये आघाडीत बिघाडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government)
राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करत आहे.
मात्र, याला अपवाद बीड आहे. शिवसेनेने केलेल्या विकास कामावर डल्ला मारण्याचे काम स्थानिक आमदार करत आहेत.
तसेच विकास कामात खोडा घालण्याचे काम देखील आमदार करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

 

Web Title :- Maha Vikas Aghadi | shiv sena mlas demand removal of raigad guardian minister aditi tatkare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6248 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Employee Pension Scheme | आता पगारदार वर्गाला मिळेल पहिल्यापेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2141 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी