Mahabaleshwar News | वेण्णालेक रोडवर खोल खड्ड्यात कार कोसळून पुण्यातील महिला भुलतज्ज्ञ डॉक्टर जखमी

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील वेण्णालेक (Vennalek) रोडवरील प्रतापसिंह उद्यानाजवळ 7 ते 8 फूट खोल खड्ड्यात कार कोसळून अपघात झाला. या अपघातात पुण्यातील (Pune) भुलतज्ज्ञ डॉ. रिमा मनोहर बोधे (anesthesiologist Dr. Rima Manohar Bodhe) (वय-32) या जखमी झाल्या आहेत. डॉ. बोधे यांच्या डोक्याला मार लागला असून स्थानिकांनी कारमधील दोन जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉ. रिमा ह्या मित्रासोबत महाबळेश्वरला (Mahabaleshwar) सहलीसाठी आले होते.

महाबळेश्वर येथून मध्यरात्री एक वाजता नोबिन खान व मुस्तकिन बागवान हे दोघे वाईकडे निघाला होते. प्रतापसिंह उद्यानाजवळ (Pratap Singh Park) येताच त्यांना महिलेचा वाचवा-वाचवा असा आवाज आल्याने ते थांबले. त्यावेळी कार खड्ड्यात कोसळल्याचे त्यांना दिसले. स्थानिक युवकांनी कारमधील जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) उपचारासाठी दाखल केले.

डॉ. रिमा महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेल्या होत्या.
साडेबाराच्या सुमारास त्यांची कार प्रतापसिंह उद्यानाजवळ आली.
त्यावेळी बारीक पाऊस पडत होता. रस्त्यावर प्रचंड धुके होते.
त्यातच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट देखील बंद होत्या.
त्यामुळे वाहनचालकाचा अंदाज चुकल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावरुन खोल खड्ड्यात कोसळली.

Web Titel :- Mahabaleshwar News | Lady doctor accident car crash on Vennalek in mahabaleshwar’s

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक