महाभारत : द्रौपदीच्या वस्त्रहरणासाठी बनवली होती 250 मीटरची खास ‘अनकट’ साडी, शूट करताना झालं ‘असं’ काही !

पोलिसनामा ऑनलाइन –जर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नसतं तर महाभारतमधील युद्ध झालंच नसतं. त्यामुळं वस्त्रहरणाचा सीन मालिकेत खूप प्रभावी होणं गरजेचं होतं. बीआर चोपडा आणि सर्वच कलाकारांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती.

खूपच कमी लोकांना माहिती आहे की, बी आर चोपडांनी या सीनसाठी खास तयारी केली होती. त्यांनी एका लांबलचक साडीची व्यवस्था केली होती. त्यांनी वस्त्रहरणाच्या या सीनसाठी 250 मीटरची अनकट साडी बनवली होती.

रूपा गांगुलीनं यामध्ये द्रौपदीची भूमिका साकारली होती. या घटनेच्या शुटींगची आठवण सांगताना मेकर्स सांगतात की, शुटींगच्या आधी बी आर चोपडा यांनी रूपा गांगुली बोलावलं आणि तिला सांगितलं की, भर सभेत जर एखाद्या महिलेचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न झाला तर तिची हालत काय होईल. अशा मूडमध्ये तू स्वत:ला आण.

कोणालाच वाटलं नव्हतं की, एकाच टेकमध्ये हा सीन शुट केला जाईल. द्रौपदीनं खूपच वास्तविक आणि ताकदीचं सीन दिला तेही एकाच टेकमध्ये. द्रौपदी चीर हरणाचा सीक्वेंस एवढा वेदनादायी होता की, तो करताना रूप गांगुली रडू लागली होती. ती इतकं रडली होती की, मेकर्स आणि स्टार कास्टला तिला शांत करण्यातच अर्धा तास लागला होता.