ताडी पिणार्‍या महिलांची करायचा ‘शिकार’, ‘सिरीयल किलर’नं केले 18 ‘मर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील पोलिसांनी एका अशा सीरिअल किलरला अटक केली आहे. ज्याचे कनेक्शन अनेक महिलांच्या हत्येशी असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर 14 खुनाच्या केसेस सुरु आहे. एका खुनाच्या आरोपावरून हा व्यक्ती जेलमध्ये देखील राहिलेला आहे. 2018 मध्ये जेलमधून सुटल्यानंतर देखील या व्यक्तीने चार महिलांचे खून केले आहेत.

42 वर्षांचा आरोपी वाई श्रीनुने 2007 ते 2015 च्या दरम्यान एकूण 14 खून केले आहेत. ज्यापैकी तीनमध्ये त्याला आरोपी सिद्ध करण्यात आले तर अकरा मध्ये तो निर्दोष मुक्त झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी वाई सलम्मा ला देखील अटक केलेली आहे. 17 डिसेंबर रोजी मेहबूबनगर जिल्ह्यातील देवर कादरा परिसरात एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. त्यावेळी याबाबत श्रीनुची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने याप्रकारे चार आणखी महिलांचा खून केल्याचे सांगितले होते.

श्रीनुने जेवढे सर्व महिलांचे खून केले आहेत तो ताडी प्यायला गेलेल्या महिलांना आपले शिकार बनवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2007 मध्ये श्रीनुने आपल्या भावाचा देखील खून केला होता ज्यामध्ये त्याला दोषी घोषित करण्यात आले आहे. तसेच ज्या 11 खुनांमध्ये त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे त्यांची पुनर्तपासणी करणार असल्याचे देखील पोलिसांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/