Mahad Flood | पिंपरीतील आत्मनगर सोसायटीतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Mahad Flood | महाड पासून 35 किलोमीटरवर असणाऱ्या चार गावांचा पुरामुळे (Mahad Flood) रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या गावातील लोकांचे जीवनावश्यक वस्तूंअभावी हाल झाले आहेत. त्यांना आत्मनगर सोसायटी (Atmanagar Society), खराळवाडी, पिंपरी-चिंचवड तर्फे दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच कपडे, टॉवेल, चादरी, औषधे यांचे शनिवारी (दि.31) वाटप करण्यात आले.

22 जुलैला झालेल्या महापुरामुळे महाड वारंगी ओढ्यावरील 20 फूट लांबीचा रस्ता वाहून गेला आहे.
रस्ता तुटल्याने जवळपास 4 गावे 5 वाडीवस्त्याचा संपर्क तुटला आहे.
लोकांचे खूप हाल होत आहेत. लाईट नसल्याने ही गावे पूर्णतः अंधारात आहेत.
तसेच बस सेवा सुरू नसल्याने बाजारपेठेत (market) येता येत नाही.
महाड शहरापासून (Mahad city) ही गावे जवळपास 35 किलोमीटर अंतरावर आहेत.
त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे मुश्कील झाले आहे.

पुरग्रस्त लोकांना आत्मनगर सोसायटीच्या वतीने मदत करण्यात आली. मदत गोळा करून पूरग्रस्तांना पोहचवण्यासाठी राजेंद्र आठवले, ओमकार नामपूरकर, अॅन्थनी सलढाणा, अमेय कदम, किशोर पुतरण,  आनंद तेजवाणी, आकाश प्रतापे, सुमित जगताप, अभिजित तापकीर, तथागत अभंगराव, ऋषी शेट्टी, राजेश हलदीपूर, महेश चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. या वेळी महाडमधील सह्याद्री प्रतिष्ठानचे (Sahyadri Pratishthan) प्रतिक मोरे यांनी मदत केली. पोलिस पाटील विजय कडू यांनी मदतीबद्दल आभार मानले.

Web Title : Mahad Flood | pimpri chinchwad atmanagar society helps mahad people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये;
फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी