महाशिवरात्रीला महादेवाची ‘पिंड’च चोरट्यांनी केली लंपास 

किल्लेधारुर : पोलीसनामा ऑनलाईन – आज महाशिवरात्र त्यामुळे महादेवाच्या भक्तासाठी मोठा दिवस आहे. अनेक भाविक महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाची उपासना करतात. मात्र जर आपला देवच चोरीला गेला तर… धुनकवड येथील एका मंदिरात असाच काहीसा प्रकार घडला आहे. महादेव मंदीरातील महादेवाची पींड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशीच उघड झाली आहे. त्यामुळे भाविकांतून संताप व्यक्त होत आहे.

किल्लेधारूर तालुक्यातील धुनकवड येथे धुनकेश्र्वर महादेवाचे मंदीर आहे. या मंदिरामुळे गावाचे नाव धुनकवड पडल्याचे सांगितले जाते. धुनकेश्वर पुरातण मंदिर आहे, शिवाय मंदिर गावचे ग्रामदैवत आहे.

धुनकवाड गावात उंच डोंगरावर हे मंदिर आहे. प्रतिवर्षी मंदिरात महाशिवरात्र उत्सव असतो. मात्र, सोमवारी सकाळी भाविक दर्शनासाठी मंदिरात पोचल्यानंतर महादेवाची पींडच नसल्याचे आढळून आले.

दरम्यान, ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पिंडच चोरीला गेल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त होतं आहे. रविवारी रात्री उशिरानंतर घटना घडल्याचा संशय आले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोचले असून पंचनामा सुरु आहे.