जानकरांनी मलकापूरात धरला ढोलावर ठेका ; पहा व्हिडिओ

मलकापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मलकापूर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून सुरुवात झाली आहे. यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आले होते. तिथे जानकरांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. त्यांच्या उपस्थित प्रचाराची पदयात्रा फेरी काढण्यात आली.

प्रचारावेळी श्री बिरोबा मंदीरात जाऊन जानकरांनी दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या आवारातच महादेव जानकर आणि अतुल भोसले यांनी स्वत: गळ्यात ढोल अडकवून ठेका धरला. त्यांच्या ढोल वादनावर उपस्थित धनगर समाजबांधवही ठेका धरत थिरकले.

सकाळी अकराच्या सुमारास मंत्री जानकर मलकापुरात आले. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांच्या घरी भेटी दिली. तेव्हा भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन जानकरांनी यावेळी दिले.

दरम्यान, यात्रेदरम्यान त्यांनी बिरोबाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या आवारातच मंत्री महादेव जानकर आणि अतुल भोसले यांनी गळ्यात ढोल अडकवून ठेका धरला. त्यांच्या ढोल वादनावर उपस्थित धनगर समाजबांधवांनी आनंद लुटला. त्यानंतर आबा गावडे यांच्या निवासस्थानी समारोप झाला.

https://www.youtube.com/watch?v=wvVTX9cJqI4