Mahadev Jankar | ओबीसींची राजकीय ताकद मजबूत करण्याचे जानकरांचे भुजबळांना आवाहन, म्हणाले – ‘मुंडे आणि तुम्ही…’

हिंगोली : Mahadev Jankar | आज हिंगोलीत दुसरी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभा पार पडली. अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या सभेला प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी ओबीसींचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची भूमिका मांडत भुजबळ यांना त्यासंबंधीचे आवाहन केले.

महादेव जानकर म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू येथे कुणाचे राज्य आले याचा विचार ओबीसी समाजाने केला पाहिजे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि छगन भुजबळ यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर आज मुख्यमंत्री म्हणून येथे आला असता.

महादेव जानकर म्हणाले, आमच्या चूका झाल्या. आता कुणाला वाईट बोलण्यात आणि शिव्या देण्यात वेळ घालवू नका. तुम्ही नेते आहात शासन बनू शकता. आम्हाला महात्मा फुलेंचा वारसा आहे. मी नुकतेच अमेरिकेला गेलो होतो. तिथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहून मी १ तास भर थांबलो. अशा महापुरुषांचे वारसदार आपण आहोत. १०० पैकी आपण ८५ आहोत तर छोट्या लोकांना मला आमदार, खासदार करा, असे म्हणत तिकीट मागायला कशाला जायचे.

जानकर (Mahadev Jankar) पुढे म्हणाले, मागणारे नाही तर देणारे झालो पाहिजे. आपल्याला छोटीमोठी सत्ता नको. कुठल्या धर्मावर आणि जातीवर टीका करण्यापेक्षा ओबीसींनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिकेचा नगरसेवक, नगराध्यक्ष होणार नाही, झालो तर आमदार, खासदारच होऊ. झेंडा धरायला यांना माणसे मिळणार नाहीत.

जानकर म्हणाले, भुजबळांपेक्षा मी लहान आहे. माझ्या पक्षाला ६ राज्यात मान्यता मिळाली.
पक्षाचे ६ आमदार आहेत. ९२ जिल्हा परिषद आहेत. उत्तर प्रदेशात मुलायम यांनी पक्ष काढला,
अखिलेश मुख्यमंत्री झाला. कांशीराम यांनी पक्ष काढला तेव्हा आपली चर्मकार भगिनी मायावती मुख्यमंत्री झाली.
आज जे पक्ष आहेत. महाराष्ट्रात कोण चालवतंय? कुणाच्या मागे आपण जात आहेत.
त्यामुळे ओबीसींनी डिमांडर नको तर कमांडर बनावे.

जानकर म्हणाले, पुण्याचे हडपसर ज्या होळकरांनी जाळले त्यांची औलाद आम्ही आहोत. आम्हाला नडणार तर आम्हीही नडू.
आम्हाला सर्वच पाहिजे. दलित आणि मुस्लिमांनाही आवाहन करा, त्यांनाही सोबत घ्या,
समाजकारण बाजूला ठेवा, राजकारणी बना तरच तुमचे प्रश्न सुटतील नाहीतर भिकाऱ्यासारखे मागत बसावे लागेल.

ओबीसी नेत्यांना आवाहन करताना जानकर पुढे म्हणाले, आम्ही पक्ष काढलाय, तुमच्यासोबत युती करायला तयार आहे.
जी जागा म्हणाल ती सोडू पण तुम्ही पक्ष काढा. आम्हाला बुद्धीने राजकारण खेळावे लागेल.
समता युग आणावे लागेल. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ एकत्र आले असते तर ही वेळ आज आपल्यावर आली नसती.
मतांच्या दृष्टीने तुम्ही सगळे ओबीसी एकत्र या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जरांगेंची भेट घेतली म्हणून रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर भूजबळ भडकले