Mahadev Jankar | ‘गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Mahadev Jankar | सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर (Bhagwan Bhaktigad) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dussehra Melava) आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्या दरम्यान रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी तुफान भाषण केलं. ‘गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली, आता तुम्ही पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. माझ्या कानात गोपीनाथ मुंडेंनी कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही’, असं महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी म्हटलं आहे.
आज (शुक्रवारी) भगवानगड येथे दसरा मेळाव्याचे (Dussehra Melava) आयोजन केले होते.
यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले की, ‘नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही ते रक्तातच असावं लागतं.
आरशासमोर भाषण केल्यानं कुणी नेता होत नाही. नेता व्हायला अक्कल लागते. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचे नव्हते, ते सर्व जाती-धर्माचे होते.
भगवान बाबांना जात नव्हती, तशी गोपीनाथ मुंडेंनाही जात नाही.
गोपीनाथ मुंडे यांनी ऊस तोडणाऱ्या माणसाच्या हातात कोयता देण्याऐवजी त्याला आयपीएस, पीएसआय केलं.
गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता.
त्यामुळे महादेव जानकर मेला तरी चालेल पण ताईची कधीच साथ सोडणार नाही. असं ते म्हणाले.
–
पुढे जानकर म्हणाले, 31 मे रोजी गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
तर, आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या (Pankaja Munde) शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे.
आमदार, खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे.
मंत्री येतो आणि जातो, पण नेता कधी मरत नसतो. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Mahadev Jankar | mahadev jankar dussehra meleva gopinath munde has whispered my ear even if i die i will not leave pankaja tai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Dhananjay Munde | ‘गावागावात संविधान भवन बांधणार’ – धनंजय मुंडे
Pune News | पौड विविध कार्यकारी संस्थेवर भैरवनाथ ग्रामविकास पॕनलचे बहुमत