बारामतीत गेल्यावेळचा वचपा आता दिसलाच पाहिजे : महादेव जानकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या रणधुमाळीला दिवसेंदिवस रंग चढत आहे. तसंच नेत्यांच्या टीकाही वाढत आहेत. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती मतदार संघ येतो. तेथे रासपचे महादेव जानकर हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कट्टर विरोधक आहेत. मागिल निवडणुकीत जानकरांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर जानकरांनी, बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे, असं म्हटलं आहे. युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

बारामतीचा निकाल म्हणजे यावेळी वोटींग स्ट्राईक असेल. ज्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन त्यांचा वारसा सांगतात त्यांनी मुलगी, पुतण्या, नातवाच्या पलीकडे काहीही बघितलं नाही. आम्ही सगळ्या मतदारसंघातून मतांचे लीड घेऊन येतो, असं म्हणत जानकरांनी फक्त बारामतीने आम्हाला “इक्वल” द्यावं, अशी विनंतीही केलं.

दरम्यान, २०१४च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंनी महादेव जानकारांचा पराभव केला. तेव्हा जानकरांनी कमळचे चिन्ह न वापरते कपबशीचे चिन्ह वापरले होते. जर जानकरांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली असती तर चित्र वेगळं असतं असं भाजपाकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करत आहे. यंदा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतले आहेत.

Loading...
You might also like