Mahadev Jankar | ‘आमचं सरकार होत तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेनं आता हुशार व्हावं’, महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये (Maharashtrra Government) विलिनीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी मागील काही दिवसांपासून संपावर (ST Workers Strike) गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु संपकरी आपल्या मागणीवर ठाण आहेत. याच दरम्यान भाजपचा (BJP) मित्रपक्ष असलेल्या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी एसटी विलिनीकरणावर भाष्य करताना भाजपला घरचा आहेर दिला आहे. आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं? असे महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले.

 

तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं…?
मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना जानकर म्हणाले, आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे विलिनीकरण (Merger) झालं? रस्त्यावर बोलताना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणे जावं लगतं, असं जानकर म्हणाले.

रविकांत तुपकारांचे बुलडाण्यात आंदोलन
शेतकरी संघटनेचे नेते रिवाकांत तुपकर यांनी बुलडाण्यात (Buldhana) आंदोलन पुकारलंय. महादेव जानकर यांनी बुलडाण्यात जाऊन तुपकर यांची भेट घेतली. रविकांत तुपकर माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचे जानकर यांनी सांगितले. तसेच तुपकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले. एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी व्हावे, म्हणून मी आलो असल्याचे मत महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title :- Mahadev Jankar | where was merger even when we had government people should be smart now mahadev jankar MSRTC Maharashtra Government ST Workers Strike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ratnagiri District Bank Election | रत्नागिरीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा झटका, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची सरशी

Kangana Ranaut | कंगना रणौत विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडून तक्रार दाखल; म्हणाले – ‘मेंटल हॉस्पिलटमध्ये पाठवा किंवा…’

Corona Europe | ‘कोरोना’मुळे युरोपातील पर्यटनाला पुन्हा ‘ब्रेक’; ऑस्ट्रियात पुन्हा लॉकडाऊन, जर्मनीमध्येही परिस्थिती बिघडली
Dattatray Bharne | राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला ‘कबड्डी’ खेळाचा मनसोक्त ‘आनंद’ (व्हिडीओ)