मंत्री महाजन नगरला दाखल ; भाजप उमेदवारी वर खलबतं

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शनिवारी (दि.०९) रोजी अचानक नगर दौ-यावर आले आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नगरच्या शासकीय विश्रामगृहावर नगर दक्षिणेतील आमदार, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा सुरू केली आहे. ही बैठक सुरूच आहे.

डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी महाजनची मुंबईतील शिवनेरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. त्या भेटीचा अनुषंगानेच महाजन हे आज दुपारी नगरला दाखल झाल्याचे बोलले जात आहे. नगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी डॉ. सुजय विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मंत्री गिरीश महाजन आणि डॉ. विखे यांची भेट आणि चर्चा गाजत असतानाच आज मंत्री महाजन नगरमध्ये दाखल झाले. ते नगर मतदारसंघातील भाजपचे आमदार, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी बंद खोलीत चर्चा करीत आहेत. डॉ विखे यांच्या प्रवेशाबाबतच या हालचाली असल्याचे मानले जात आहे.

ह्याहि बातम्या वाचा

” चोराने राफेलची कागदपत्रं परत आणून दिली वाटतं ”

सायनाला पती कष्यप म्हणाला, “तू सध्या मूर्खासारखे खेळत आहेस”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता ; ‘या’ नेत्याचे विधान

भाजपला धक्का : मोदींचा कट्टर विरोधक काँग्रेस सोडणार नाही