महाजनादेश यात्रेचे पाथरीत भव्य स्वागत

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – पाथरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी दाखल झाली होती. या वेळी पाथरी येथे या आलेल्या यात्रेचे भव्य स्वागत करण्यासाठी ठिक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दुभाजकावर पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. तहसील व पंचायत समिती सेंट्रल नाका परिसरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते.

काल गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजन आदेश यात्रा पाथरीत दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या यात्रेला पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यातील तसेच ग्रामीण परभणी भागातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पाथरी शहरातील जिल्हा परिषद मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस बोलताना म्हणाले की यात्रा काढणे ही पक्षाची परंपरा आहे. विरोधकांच्या सभेला साधे मंगल कार्यालय ही भरत नाही व ते पराभवातूनही शिकले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाच वर्षात एवढा विकास केला की विरोधकांनी पंधरा वर्षात केला नाही असा दावा त्यांनी केला. दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड योजना आणली असून औरंगाबाद, जालना, बीडचे कामाला सुरुवात होत आहे.

शेतकऱ्यांनी भरलेला पैसा विमा कंपन्यांना खाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासारखा जटिल प्रश्न मी सोडू शकतो तर पिक विमा सारखा प्रश्न का सोडू शकणार नाही असे ते म्हणाले. यावेळी सभेला मोठा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विचार मंचावर सुरजीत सिंग ठाकूर पाथरी विधानसभेचे आमदार मोहन फड, माजी आमदार विजय गव्हाणे, पाथरी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी विजय सीताफळे, सुभाष आंबट, अहमद चाऊस, डॉक्टर देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र राज्य हे ओबीसीचे मंत्रालय निर्माण करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते काश्मीर प्रश्नावर बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी 370 काढून काश्मीरच्या विकासाला चालना दिली आहे. काश्मीर मध्ये अगोदर सुईचे टोका एवढी जमीन खरेदी करता येत नव्हती. सभेच्या शेवटी त्यांनी उपस्थितांना संवाद साधला ते म्हणाले सांगा मला तुमचा जनादेश आहे काय पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना जनादेश आहे काय आमदार मोहन फड यांना जनादेश आहे काय यावरती उपस्थितांनी होकार असल्याचा आवाज आयोजित सभेत ठिकाणी केला.

प्रस्तावित करताना आमदार मोहन फड म्हणाले की विधानसभा मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्यात कटिबद्ध आहे. ढालेगाव येथील उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी राखीव ठेवण्याची आमदार मोहन फड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पाथरी येथून परभणीकडे रवाना झाली.

आरोग्यविषयक वृत्त –