‘महाजनादेश’ यात्रेने धरले पुणेकरांना ‘वेठीस’

पोलीस बनले मुक, लोकांनी दिली महात्मा गांधीच्या माकडांची उपमा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महात्मा गांधी यांचे तीन माकडे सर्वांना माहिती असतील. एक माकड म्हणते मी काही पाहिले नाही, दुसरे म्हणते मी काही ऐकले नाही आणि तिसरे म्हणते मी काही बोललो नाही. पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांची शनिवारी पुणेकरांनी या माकडांशी तुलना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी सायंकाळी पुणे शहरात आली. दोन दिवसांपूर्वी गणेशोत्सवात मंडपाजवळ फ्लेक्स लावणाऱ्या मंडळांना अनेक परवानग्या घेण्यास लावणारे, प्रसंगी फ्लेक्स कारवाईची धमकी महापालिकेचे अधिकारी देत होते. दुसरीकडे गणेशोत्सवात व विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांना केवळ २ बेस व २ टॉपला परवानगी देणारे, प्रसंगी साऊंड सिस्टिम जप्त करणारे पुणे पोलीस हेच का असा प्रश्न शनिवारी शहरात साऊंडचा दणदणाट सुरु होता तो पाहून लोकांना पडला होता.

महापालिका आणि पुणे पोलीस यांची भूमिका दोन दिवसात अचानक बदलली आणि दिवसभर सुरु असलेला हा तमाशा ते मुकपणे पहात राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर अशी एकही जागा नव्हती की तेथे भाजपाचे नेते, कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून लावलेल्या या फ्लेक्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. काही कार्यकर्त्यांनी याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर त्यांनी चक्क आपल्याला याविषयी काही माहिती नसल्याचे धक्कादायक उत्तरे दिली. एरवी दुकानावर लावलेला बोर्डही बेकायदा असल्याचे सांगत कारवाई केली जाते. कोणी नुसते कारवाई करु नका असे सांगितल्यावर त्याच्यावर पोलीस सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल ३५३चा गुन्हा दाखल करुन अटक करतात. त्याला पोलीस कोठडीत बेदम मारहाण करतात. पण काल हे सर्व पोलीस रस्त्या रस्त्यांवर दिसत असलेले वाहतूकीला अडथळा आणणारे मोठमोठे फ्लेक्स मुकपणे पहात बंदोबस्त करत होते.

रस्त्यावर अनेक ठिकाणी स्वागताच्या नावाखाली स्पिकरचा दिवसभर दणदणाट सुरु होता. तो आवाजही बंदोबस्तावर देखरेख करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर पोहचू शकला नाही. बहुतेक गणेश विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने स्पिकर बंद करायला लावल्यामुळे त्यांनी ही दुसऱ्या  दिवशी परवानगी दिली असावी, असा टोमणा सोशल मिडियावर पोलिसांना मारला जात होता.

या महाजनादेश यात्रेमुळे शनिवारी सायंकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर अभुतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. शहरात महाजनादेश यात्रेने प्रवेश केल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत आलेल्या शेकडो गाड्यांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडली होती. यात्रा येण्यापूर्वीच अनेक रस्ते बंद केल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. पण त्याची काहीही फिकीर भाजपाच्या नेते अथवा कार्यकर्त्यांना नव्हते. ते आपल्याच कोशात अडकून मी मुख्यमंत्र्यांना कसा दिसेल, यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलीस आणि महापालिकेची भूमिका संशयास्पद ठरली. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली या दोन्ही सरकारी संस्था काम करीत असल्याचे दिसून येत होते. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही होईल, असा प्रश्न अनेक कार्यकर्ते सोशल मिडियावर व्यक्त करीत होते.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like