पितृपक्षात अशा प्रकारे करा लक्ष्मी मातेची पूजा, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी ठरेल ‘लाभदायक’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महालक्ष्मी ही धन आणि संपत्तीची देवी आहे. समुद्रातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला आहे असे मानण्यात येते. श्री विष्णू सोबत लक्ष्मी मातेने विवाह केला होता. लक्ष्मी मातेची पूजा केल्याने इच्छित धन प्राप्ती होते आणि व्यक्ती वैभवशाली होतो. जर लक्ष्मी नाराज झाली तर माणूस दरिद्री बनतो. ज्योतिषमध्ये शुक्र ग्रहाचा संबंध या सोबत जोडला जातो.

लक्ष्मी मातेची पूजा केल्याने काय मिळते
फक्तच धनच नाही तर नाव आणि यश सुद्धा लक्ष्मी मातेच्या पूजेने मिळते.
लक्षमीच्या भक्तीने दाम्पत्य जीवन सुखकर होते.
विधिवत लक्ष्मी पूजन केल्याने उचित धन मिळते.
पितृ पक्षात लक्ष्मी पूजा केल्याने मानला मोठे समाधान मिळते.
या वर्षी पितृपक्षात लक्ष्मी मातेची पूजा २१ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

विशेष लक्ष देऊन पूजा करणे गरजेचे
लक्ष्मी मातेची पूजा तेच लोक करू शकतात ज्यांचे आई वडील जिवंत आहेत.
जर श्राद्धा बाबत नियमांचे पालन करत असाल तर लक्ष्मी मातेची पूजा करू नका.
घरातील कोणीही व्यक्ती पूजा करू शकतो ज्याचे आई वडील जिवंत आहेत.

व्यवसाय करणाऱ्यांनी अशी करावी पूजा
व्यवसाय करण्याच्या ठिकाणी गणपती, लक्ष्मी आणि विष्णूंची प्रतिमा लावावी.
लक्ष्मीच्या उजव्या बाजूला विष्णूंची आणि डाव्या बाजूला गणपतीची प्रतिमा स्थापित करावी.
नियमितपणे कमला सुरुवात करण्याआधी एक गुलाबाचे फुल अर्पण करणे.
तुपाचा दिवा आणि गुलाबाच्या सुगंधाची धूप लावावी.

नोकरदारांनी अशी करावी पूजा
पूजेच्या ठिकाणी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीची प्रतिमा लावावी.
प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून अत्तर अर्पित करावे
रोज संध्याकाळी पूजा होताच तीन वेळा शंख नाद करावा

visit : Policenama.com