७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुटका ; मुख्यमंत्र्यांनी रेस्क्यू टीमचे केले अभिनंदन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वदूर होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेतील प्रवाशांना बसला आहे. पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान अडकून पडली. या रेल्वेमध्ये जवळपास ७०० प्रवासी होते. या प्रवाशांना NDRF व नौदलाच्या जवानांनी सुरक्षितरित्या रेल्वेच्या बाहेर काढले.

तस्वीरों में देखें- कैसे 7 घंटे में बचाए गए महालक्ष्मी एक्सप्रेस के सभी यात्री

महालक्ष्मी एक्सप्रेस वेगाने रुळावरून जात असताना जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे रेल्वे मध्येच अडकून पडली. यानंतर स्थानिक प्रशासनासोबत NDRF ची टीम रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यासाठी दाखल झाली. पहिल्यांदा रेल्वे संरक्षण दल RPF आणि पोलिसांच्या टीमने प्रवाशांना खाण्या पिण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. प्रवाशांमध्ये ९ गरोदर महिलांचा समावेश होता. रेस्क्यू टीममध्ये ३७ डॉक्टरांचे पथक आणि ऍम्ब्युलन्स घटनास्थळी पोहचले होते. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वायुसेनेचे आणि नौदलाचे जवान देखील सहभागी झाले. नौदलाच्या हेलिकाप्टरमधून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

तस्वीरों में देखें- कैसे 7 घंटे में बचाए गए महालक्ष्मी एक्सप्रेस के सभी यात्री

जिल्हाधिकारी स्वत: सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफच्या जवानांनी दुपारी बाराच्या सुमारास मदतकार्य सुरू केले. त्यांना अन्य यंत्रणांबरोबरच स्थानिक नागरिकांची साथ मिळाली. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर १४ बस गाड्या व तीन टेम्पोंच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपपणे पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेस्क्यू टीमचे अभिनंदन केले तसेच आभारही मानले. सेंट्रल रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महालक्ष्मी एक्सप्रेसमधून सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी एक स्पेशल रेल्वे कल्याणवरून कोल्हापूरला जाईल.

आरोग्यविषयक वृत्त –