Mahalunge MIDC Police Station | चाकणमधील औद्योगिकरणामुळे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला गृह विभागाकडून मान्यता

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Mahalunge MIDC Police Station | चाकणमधील औद्योगिकरणामुळे (Industrialization in Chakan) चाकण-महाळुंगे परिसर संवेदनशील झाला आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी भागात स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी मागणी होत होती. अखेर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला गृह विभागाने (Home Department) मान्यता दिली आहे. त्यामुळे महाळुंगे पोलीस चौकी आता महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे (Mahalunge MIDC Police Station) होणार आहे. चाकण पोलीस ठाण्याचे (Chakan Police Station) विभाजन करुन चार वर्षापूर्वी महाळुंगे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली होती.

नव्याने मान्यता मिळालेल्या महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात  पाईट चौकीच्या अंतर्गत येणारी सर्व गावे समाविष्ट केली आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 48 गावांचा समावेश केला असून उर्वरित 23 गावे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार आहेत. चाकण एमआयडीसीसाठी खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे याठिकाणी नवीन पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड आयुक्तालय (Pimpri-Chinchwad Commissionerate) अस्तित्वात आल्यानंतर पाठवण्यात आला होता. पोलीस ठाण्यांच्या भोगौलिक सीमाबदलाचा अभ्यास करुन शासनाकडे पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र पोलीस महासंचालक (DGP) कार्यालयाकडून महाळुंगे पोलीस चौकीला मान्यता देण्यात आली होती.

महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील गावे

महाळुंगे, खराबवाडी, आंबेठाण, बोरदरा, भांबोली, वराळे, वासुली, कोरेगाव खुर्द, शिंदे, सावरदरी, खालुम्ब्रे, सांगुर्डी,
येलवाडी, कान्हेवाडीतर्फे चाकण, मोई, निघोजे, कुरुळी (पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजू), कुरकुंडी,
तळवडे, आसखेड बुद्रुक, आसखेड खुर्द, शेलू, करंजविहिरे, धामणे, पाईट, कोये, वाकीतर्फे वाडा, वाहागाव,
देशमुखवाडी, वाघू, कोळीये, कान्हेवाडी खुर्द, पराळे, कोहिंडे खुर्द, गडद, वेल्हावळे, रौंधळवाडी, आखतुली, आडगाव,
पाळू, अनावळे, कासारी, टेकवडी, तोरणे बुद्रुक आणि अहिरे.

Web Title :- Mahalunge MIDC Police Station | recognition of mahalunge midc police station pimpri chinchwad chakan maharashtra home dept

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…