Mahalunge Pune Crime News | लिफ्टमध्ये ओळख वाढवून फ्लॅटमध्ये प्रवेश, ओढणीने गळा दाबला, कमोडमध्ये डोकं कोंबलं, पुण्यात वयोवृध्द महिलेची रेकी करून तरुणीकडून लुटण्याचा प्रयत्न

पुणे: Mahalunge Pune Crime News | म्हाळूंगे परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृध्द महिलेची रेकी करून एका तरूणीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेतील आरोपी तरूणीने त्या वयोवृध्द महिलेची रेकी केली, त्यानंतर घरात घुसली. मारहाण करत जवळ असलेले सोने लुटण्याचा प्रयत्न केला. बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार ३१ जानेवारीला घडला आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी वयोवृध्द महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर गेली. वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली, तोच तिच्या मागोमाग जाऊन या तरुणीने वृध्द महिलेवर जीवघेणा हल्ला केला. तिचा गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले, अजून काय आहे सांग अशी धमकी दिली.

वयोवृध्द महिला प्रतिकार करत होती. पण, तिला ओढून कमोडमध्ये तिचे डोके कोंबले, वरून पाणी सोडले, गुदमरून महिला मरणार तेवढ्यात तिने डोकं फिरवले, मला मारू नकोस, तुला कानातील व इतर सगळं सोनं, पैसे देते, मला सोड, अशी ती महिला तरुणीला म्हणाली. त्यानंतर वृद्ध महिलेने कानाला कुडक्या काढण्यास हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली. मला वाचवा, मला वाचवा असे मोठयाने ओरडली.

समोरच्या कुटूंबातील महिला गॅलरीत उभी होती, तिने मुलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर हे सर्वजण काही वेळात तेथे पोहोचले आणि दार तोडून महिलेला वाचवले. त्यानंतर त्यांनी तरुणीला पकडून ठेवले. आता आपली खैर नाही हे ओळखून तरुणीने बॅगेतील गंठण काढून दिले. बावधन पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime Court News | Stepmother and father were beating 10-year-old girl with a candle, father was doing bad touch, District Court orders Dighi Police to register a case under POCSO

Pune Crime Court News | सावत्र आई आणि वडिल 10 वर्षाच्या मुलीला मेणबत्तीने देत होते चटके, वडिल करत होते बॅड टच, जिल्हा न्यायालयाने दिघी पोलिसांना पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश