अमिताभ यांच्यासाठी महामृत्युंजय यज्ञ, कोरोनामुक्त होईपर्यंत यज्ञात आहुती देणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. अमिताभ कोरोनामुक्त व्हावेत यासाठी देशभरातील चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या कोलकात्यामधील अशाच एका चाहत्याने त्यांच्यासाठी महामृत्युंजय यज्ञ सुरू केला आहे.

अमिताभ यांचा फॅन विजय पतोडिया याने अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी महामृत्युंजय यज्ञ केला आहे. जोपर्यंत अमिताभ कोरोनामुक्त होणार नाहीत, तोपर्यंत आपण यज्ञामध्ये आहुती देत राहणार, असे विजय यांनी सांगितले. याआधी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात पंडितांनी अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी यज्ञ केला होता. नंदिराचे मुख्य पंडित दिनेश गुरू त्रिवेदी यांच्या नेतृत्वात 11 पंडितांनी जप केला. रविवारी दोन तास हा जप सुरू होता. अमिताभ यांच्यासाठी इतक्या लोकांनी प्रार्थना केली की ते पाहून अमिताभ भावुक झाले आहेत. अमिताभ यांनी कवितेच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानलेत. मी तुमच्यासमोर हात जोडून आणि नतमस्तक होऊन तुमचे आभार मानतो असे अमिताभ म्हणाले आहेत.