बदायूंमध्ये महिलेसोबत राक्षसीकृत्य करणारा मुख्य आरोपी पूजारी अटकेत, गावातच लपला होता

बदायूं : बदायूंमध्ये मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिची क्रौर्याची परिससिमा गाठत हत्या करणारा पूजारी (Mahant ) सत्यनारायण यास गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. पूजारी (Mahant ) घटनास्थळ असलेल्या गावातच लपला होता. गुरुवारीच पूजारीवर बक्षीस वाढवून 50 हजार करण्यात आले होते. पोलिसांनुसार, तो गावातून पळून जाण्याची तयारी करत होता. या दरम्यान ग्रामस्थांनी पकडून त्याला पोलिसांकडे सोपवला.

बदायूंच्या उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 जानेवारीच्या सायंकाळी 50 वर्षीय आंगणवाडी सहायक महिलेवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेवर निर्भयासारखा अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. या नराधमांनी तिच्या गुप्तांगात रॉड सारखी वस्तू टाकल्याचे समोर आले होते. तिची डावी बरगडी, डावा पाय आणि फुफ्फुसाचे वजनदार वस्तूचे प्रहार केल्याने पूर्णपणे नुकसान झाले होते. महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर जखमा होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेले होते.

पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून अधिकारी हैराण झाले होते. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर उघैती पोलिसांनी मंदिराचा पूजारी सत्यनारायण दास, त्याचा साथीदार वेदराम आणि यशपाल यांच्याविरूद्ध दुष्कर्म आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वेदराम आणि यशपालला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले होते. फरार पूजारी सत्यनारायण दासवर 50 हजार रूपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.

तपासात आढळले की पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही आणि प्रकरणाला अपघात असल्याचे पोलीस सांगत राहिले. गुरुवारी सकाळी आयजींच्या निर्देशानंतर संपूर्ण प्रकरणात बेपर्वाई करणारा उघैतीचा इन्स्पेक्टर राघवेंद्र प्रताप सिंह याच्याविरूद्ध कलम 166 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला सस्पेंड करण्यात आले आहे. आरोपीविरूद्ध विभागीय चौकशी सुद्धा केली जाईल.