CM उद्धव ठाकरेंना ‘अयोध्ये’त पाय ठेवू देणार नाही, महंत राजू दास यांची ‘धमकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या शनिवार पासून अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्याला आता साधू-संतांनीच विरोध केला आहे. हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नसल्याची धमकी महंत राजू दास यांनी दिली आहे.

राजू दास यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही धमकी दिली आहे. महंत राजू दास यांनी धमकी देताना म्हटले आहे की, मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरुन भरकटली आहे. आता उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होत असून त्या निमित्ताने ते अयोध्येत शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
https://twitter.com/rajudasayodhya/status/1234057363159703554
लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्तवाच्या मुद्यावरून शिवसेनची कोंडी होत आहे. निवडणुका झाल्यावर अयोध्येला जाण्याच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका मवाळ झाल्याची चर्चा सुरु झाली होती.

यापूर्वी देखील झाला होता विरोध
लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. त्यावेळी देखील त्यांना विरोध करण्यात आला होता. या दर्शन घ्या, आरती करा… पण अयोध्येत राजकारण करू नका असे म्हणत अयोध्येतील काही संत-महंतांनी त्यांना विरोध केला होता. अयोध्येला राजकारणापासून दूर ठेवा, असंही महंत राजू दास यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात म्हटलं होतं.