मिरजेत अतिक्रमण काढताना सहायक आयुक्तांना मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मिरज शहरातील माधव थिएटर परिसरात अतिक्रमण काढताना दोघांनी महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण केली. यामध्ये सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला.

सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. तसेच तीनही शहरातील धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. मिरजेत दोनशेहून अधिक इमारती धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. संबंधित इमारतीच्या मालकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. दोनशेपैकी चाळीस इमारती महापालिकेने पाडल्या आहेत. त्याच बरोबर अतिक्रमण काढण्याचे कामही सुरू आहे.

गुरुवारी माधव थिएटरजवळ असणारे अतिक्रमण हटवण्यासाठी सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, कर्मचारी जेसीबीसह अन्य साहित्य घेऊन गेले होते. तेथे दोघांनी अतिक्रमण हटावला विरोध करून घोरपडे यांना मारहाण केली. यावेळी जेसीबी चालकाला मारहाण करून जेसीबीची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like