Mahapour Chashak | महापौर चषक स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट, स्पर्धेेच्या मान्यतेस वित्तीय समितीचा नकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी महापौर चषक (Mahapour Chashak) स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी महापौर चषक (Mahapour Chashak) स्पर्धा होणार असे वाटत असतानाच महापालिकेच्या वित्तीय समितीने (Municipal Finance Committee) या स्पर्धेला नकार दिला आहे. त्यामुळे यंदाच्या महापौर चषक स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक वर्षी महापौर चषक
(Mahapour Chashak) स्पर्धेचे आयजन केले जाते.
ही स्पर्धा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येते.
या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे यासाठी पालिकेकडून खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
स्पर्धेसाठी महापालिकेकडून सात ते आठ कोटी रुपये खर्च केले जातात.
यामध्ये 18 ते 20 स्पर्धांचे आयोजन केले जाते.
या स्पर्धा खुल्या गटासोबत शालेय स्तरावर (school level) देखील भरवल्या जातात.

दरम्यान गेल्या वर्षी राज्यात कोरोनाचे संकट होते. पुण्यात (Pune) कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने महापौर चषक स्पर्धा रद्द केली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (Corona second wave) शहरातील रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) केले जात आहेत.
महापालिका प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, मैदाने, जलतरण तलाव, खुली केल्याने यंदाच्या वर्षी महापौर चषक स्पर्धा आयोजित केली जाईल असे वाटत होते.
मात्र, या स्पर्धेच्या खर्चाला मान्यता देण्याबाबत वित्तीय समितीने आर्थिक संकटाचे कारण पुढे करत स्पर्धा घेण्यास व त्यासाठी होणाऱ्या खर्चास मान्यता देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title : Mahapour Chashak | Uncertainty over Mayor’s Cup competition, Finance Committee’s refusal to accept the competition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI WECARE | खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के जास्त व्याज, मार्च 2022 पर्यंत आहे गुंतवणुकीची संधी

MSEDCL | पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश, पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाखांची विजचोरी उघड

Deepak Ramchandra Mankar | राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि पवार कुटुंबाचे निकटवर्ती दीपक मानकर यांचे निधन