Mahar Regiment HQ | महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

Mahar Regiment HQ | Mahar Regiment HQ Dr. Babasaheb Ambedkar's statue to Prime Minister Narendra Modi begins campaign to send postcards

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mahar Regiment HQ | महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा या प्रमुख मागणी साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चा व महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाला पोस्ट कार्ड पाठवण्याच्या अभियाना ची सुरुवात करण्यात आली.

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या अभियानात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे पंधरा हजार नागरिकांनी सहभाग दर्शवला. अंदाजे एक लाख पोस्टकार्ड पुणे शहरातून पाठवण्याचा मनोदय यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे व महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक कॅप्टन भगवान इंगोले, नायक सुरेश वानखडे, नायक धनराज गडबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

पोस्ट कार्ड पाठवण्याच्या मोहिमेमध्ये आंबेडकरी चळवतील ज्येष्ठ नेते वसंत साळवे, आरपीआय आठवले गटाचे प्रादेश संघटक परशुराम वाडेकर, अ‍ॅड. मोहन वाडेकर, भारत मुक्ती मोर्चाचे सचिन बनसोडे, रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र मोरे, दलित पॅंथर ऑफ इंडियाचे बापूसाहेब भोसले, रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे विवेक बनसोडे, भिम सेवा प्रतिष्ठानचे राम डंबाळे, सिद्धांत सुर्वे, निखिल बहुले इत्यादी सहभागी झाले होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक डंबाळे, राहुल नागटिळक यांनी केले यावेळी महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसवण्यासाठी राज्यभरातून किमान दहा लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा मानस असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.

Total
0
Shares
Related Posts