निर्णय घटीका ‘समीप’ ! ‘तिढा’ न सुटल्यास शिवसेना तोडू शकते भाजपासोबतची ‘युती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेवरुन सावळा गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्रिपदावरुन भाजप शिवसेनेचे दोन्ही नेते दावा सोडण्यास तयार नाहीत. परंतू आता चर्चा सुरु झाली आहे ती भाजप शिवसेना युती तुटण्याची. असे सांगितले जात आहे की लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर शिवसेना महायुतीतून बाहेर पडू शकते. दरम्यान शिवसेना भवनावर उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली, या बैठकीआधी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, आम्ही उद्धव ठाकरेंच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहोत, आम्हाला जोपर्यंत हॉटेलवर थांबण्यास सांगितले जाईल तोपर्यंत आम्ही येथेच थांबू.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रयत्नात भाजप –
शिवसेनेने स्पष्ट केले की भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. काही वेळापूर्वी झालेल्या बैठकीत संजय राऊत म्हणाले की त्यांचा लढा सुरु राहिलं, आमचे आमदार अजून हॉटेलमध्येच आहेत.

रात्री उशीरा हॉटेलमध्ये पोहचले होते आदित्य ठाकरे –
गुरुवारी रात्री उशिरा आदित्य ठाकरे मुंबईच्या रंग शारदा मध्ये पोहचले होते. फोडाफोडीचे राजकारणापासून सावध पवित्रा घेत शिवसेनेचा राज्यातील आपल्या आमदाराना मुंबईत रंग शारदा हॉटेलमध्ये बोलावून घेतले आहे. हे आमदार पुढील दोन दिवस याच हॉटेलमध्ये राहतील. विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीवर विचार करण्यात येईल.

काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी सांगितले की भाजप आमच्या आमदारांना संपर्क करुन प्रलोभन दाखवत आहेत. काँगेस आमदार नाना पटोले देखील दिल्लीत रवाना झाला आहे. दिल्लीत महाराष्ट्रांच्या आमदारांची बैठक आहे ज्यानंतर ते जयपूरला जातील.

गडकरी मध्यस्थीस तयार –
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की गरज भासल्यास आपण मध्यस्थीस तयार आहोत. ते म्हणले की शिवसेनेबरोबर आमची मुख्यमंत्रिपद वाटपाबाबात कोणतीही बातचीत झालेली नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. मुख्यमंत्रिपद भाजपकडे आहे.

नितिन गडकरी यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल. आम्ही शिवसेनेसह युतीत निवडणूका लढल्या आहेत. बाळासाहेब असताना देखील मुख्यमंत्रिपदावर रस्सीखेच झाली होती. तेव्हा आम्ही निश्चित केले होते की ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होईल.

गडकरी म्हणाले की आमदारांच्या खरेदीबाबत केले जात असलेले आरोप खोटे आहेत. आम्ही आमदार फोडाफोडीच्या भूमिकेचे नाहीत. शिवसेनेला सकारात्मक विचार केला पाहिजे. राज्यातील जनतेच्या हितार्थ निर्णय घेतला पाहिजेत. त्यांनी हे ही स्पष्ट केले की सरकार बनवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांची कोणतीही भूमिका नाही.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके