Maharashta School Update | विद्यार्थ्यांचं यंदाचं मामाच्या गावाला जायचं प्लॅनिंग लांबणीवर; शिक्षण विभागानं घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashta School Update | राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाती बातमी आहे. वार्षिक परीक्षा संपताच उन्हाळी सुट्ट्या (Summer Vacation) घालवण्यासाठी मामाच्या गावाला किंवा दुसरीकडे कुठे जाण्याचं नियोजन करत असाल तर थांबा. कारण शिक्षण विभागाने मोठा निर्णय (Maharashta School Update) घेतला आहे.

 

कोरोनामुळे (Corona) विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने (School Education Department) मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या (Maharashta School Update) आहेत. एप्रिल महिन्यातही शाळा पुर्णवेळ घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यातही अभ्यास करावा लागणार आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी माहिती दिली आहे.

 

कोरोनामुळे शाळा बंद होत्या त्यामुळे अभ्यासक्रमही पुर्ण झाला नाही. लवकरात लवकर शाळा सुरू करून पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी,
पालक आणि शिक्षक संघटनेनंही मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

 

दरम्यान, आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांसह सुट्टीवर जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं.
मात्र आता ते त्यांना पुढे ढकलावं लागणार असून त्यांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

 

Web Title :- Maharashta School Update | summer vacation cancel decision of school education department maharashtra school news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena Saamana Editorial On Kirit Somaiya | ‘अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही’ – शिवसेना

 

Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’च्या उल्लेखाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान !

 

Chandrakant Patil | ‘तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे, शिवसेना – काँग्रेस मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या’ – चंद्रकांत पाटील