विद्यार्थिनींना ‘अश्लील’ व्हिडीओ दाखवणाऱ्या शिक्षकाविरुद्ध FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट, नांदेड येथील प्रकरणे ताजी असतानाच औरंगाबादमधील सिडकोत असलेल्या मुकुल मंदिर शाळेतील सातवीच्या विद्यार्थिनींना शाळेतीलच शिक्षकांनी अश्लिल व्हिडिओ दाखविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. किरण परदेशी असे शिक्षकाचे नाव असून त्याने शाळेतील मुलींना अश्लिल व्हिडिओ दाखवला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पालकांनी आज (मंगळवार) किरण परदेशी या शिक्षकाला पाठिशी घालत असलेल्या संस्थाचालकाविरोधात मुख्याध्यापकांना घेराव घातला. सात दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांना तक्रार करुन देखील टाळाटाळ होत असल्याने संतापलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, शिक्षकावर कारवाई करा अशी मागणी करत ठिय्या मांडला. सायंकाळ पर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

संस्थापातळीवरून शिक्षकाला पाठिशी घातले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांकडून पोलिसांकडेही तक्रारपत्र देण्यात आले होते. मात्र, या प्रकाराबाबत संबंधित शिक्षकाला पाठबळ दिले जात आहे. गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याने पालकांनी शाळेत धाव घेतली. मुख्याध्यापक सुरेश परदेशी यांना घेराव घालून त्यांना या प्रकरणाचा जाब विचारण्यात आला. त्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.