पुण्यात रंगणार 63 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ची लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2 ते 7 जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहेत. बालेवाडी येथील पुण्यातील शिवछत्रपती क्रिडा संकूल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही माती आणि गादी अशा दोन प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येकी दहा आणि एकूण वीस गटांमध्ये ही कुस्ती स्पर्धा खेळवण्यात येईल, अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत स्पर्धेच्या नवी लोगोचं अनावरण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने अमनोरा टाऊनशिपचे विकासक असलेल्या सिटी कार्पोरेशन लिमिटेडसोबत 5 वर्षासोबत करार केला आहे. या अंतर्गत स्पर्धेचे आयोजन चांगल्या पद्धतीने व्हावे, स्पर्धेचा स्तर विविध पातळीवर उचवावा आणि मल्लांसोबतच प्रेक्षकांचाही फायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्याताल तब्बल 12 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. 2017 मध्ये भुगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच पैलवान अभिजीत कटके विजयी झाला होता. मॅटवर झालेल्या या कुस्तीमध्ये अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला पराभूत केले होते. तर 62 महाराष्ट्र केसरी स्पर्धा जालना येथे पार पडली होती. या स्पर्धेत बुलढाण्याचा पैलवान बाला रफिक शेख हा विजयी झाला होता. या लढतीत त्याने गतविजेत्या अभिजीतचा पराभव केला होता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/