धक्कादायक ! राज्यात 24 तासात 87 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 1758 बाधित तर 18 जणांचा बळी

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना त्याला बंदोबस्तावर असलेले पोलीस बळी पडत आहेत. गेल्या २४ तासात राज्यातील ८७ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या १ हजार ७५८ इतकी झाली आहे. आतापर्यंत त्यापैकी १८ जणांना आपले प्राण गमवावे लागणार आहे. त्यात मुंबईतील १४ जणांचा समावेश आहे. पुणे २, ठाणे आणि सोलापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यातील ६७३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील काही जण कोरोना रुग्णाबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन पुन्हा कामावरही रुजू झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like