काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या त्या युवासैनिकांची आदित्य ठाकरेंकडून हकालपट्टी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यानंतर यवतमाळ येथे काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवाशिवसैनिकांना युवसेनाअध्यक्षानी दणका दिला आहे.मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकत्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली.

“राग दहशतवादाविरूध्द ठेवावा, निष्पापांवर का ? ” ” दहशतवादाची सजा कोणत्याही भारतीयास नको “,अशा स्वरुपाची ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आदित्य ठाकरे म्हणाले, काल यवतमाळमध्ये काही जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांबाबत दुर्दैवी घटना घडली. याबाबत आम्ही कालच पत्रक प्रसिध्द करून आमची भूमिका स्पष्ट केली आहे.हा मुद्दा संवेनशील आहेच, मात्र आमच्या भूमिकेकडून दुर्लक्ष करून आमची बदनामी करण्याचा काहींचा हेतू असू शकतो.

यवतामाळ काश्मिरी विद्यार्थ्यांना माहारण करणाऱ्यांमध्ये जे सहभागी होते, त्यांची हकालपट्टी केली आहे.जम्मू-काश्मिर हा भारताचा एक भाग आहे.त्यामुळे अशा पध्दतीने कश्मिरींना मारुन दहशतवादी विरोधी रोष व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही रोष समजू शकतो,पण हा रोष दहशतवादाविरोधात असावा, निष्पाप विद्यार्थांनवर नको,असं शिवसेनेच्या युवासेना अध्यक्षांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या युवासैनिकांनी गुरूवारी २१ फेब्रुवारीला यवतमाळमध्ये शिक्षणासाठी आलेल्या ३ ते ४ काश्मिरी विध्यार्थांना मारहाण केली. युवासेनेच्या १० ते १२  कार्यकर्यांनडून ही मारहाण करण्यात आली.  वैभवनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, मारहाणीनंतर काश्मिरी विद्यार्थी लोहारा याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या हल्ल्यातील आणखी काही कार्यकर्त्यांचा शोध सुरु केला आहे. या मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.