नांदेड जिल्हयात बालतपस्वी शिवाचार्य महाराजांसह त्यांच्या सेवेकर्‍याची हत्या करणारा सराईत अटकेत, झाला महत्वाचा खूलासा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – उमरी तालुक्यातील नागठाण बु. येथील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतिनाथ महाराज यांच्यासह अन्य एकाच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. साईनाथ लिंगाडे (वय-30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी लिंगाडे याला नजीकच्या तेलंगणा राज्यातील तानुर पोलिसांनी अटक केली. तानुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळवी या गावातील एका मंदिराजवळ हा आरोपी संशयितरित्या थांबला होता. पोलिसांनी आरोपी येळवी येथील मंदिराजवळ थांबल्याचे समजातच पोलिसांनी त्याला लगेच चौकशीसाठी ताब्यात घेतले.

आश्रम से लेकर भागना चाहता था साधू का शव

त्याच्याकडे नागठाण येथून पळवून नेलेली दुचाकी, रोकड, दागिने सपडल्याची माहिती तानुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक राजेन्ना यांनी दिली. काही वेळानंतर या आरोपीला धर्माबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेन्न यांनी दिली. रात्री दीड वाजताच्या सुमारास पशपतीनाथ महाराज यांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांचा खून केला. त्याच मठातील बाथरुमध्ये अन्य एक मृतदेह सापडला. भगवान शिंदे अशी त्यांची ओळख पटली असून ते उमरीमधील रहिवाशी आहेत. ते मठापतींचे सेवेकरी होते.

गावकऱ्यांचा खुलासा
आरोपीने मठात जाऊन महाराजांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि गळा दाबून खून केला. त्यानंतर रोकड, लॅपटॉप चोरी केली. महाराजांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. पण मठाच्या बाहेर गाडी काढताना ती गेटला धडकली. गाडीचा मोठा आवाज आल्याने लोक गोळा झाले. तेव्हा लोकांना महाराजांचा मृतदेह आणि ऐवज गाडीत सापडला. संधी साधून आरोपीने तेथून पलायन केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like