Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | बोगस खते, बी-बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक कार्यवाही; 77 पोलीस स्टेशन मध्ये FIR, 76 परवाने रद्द

मुंबई : Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | बोगस खते, बियाणे आणि किटकनाशके यांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक (Cheating With Farmers) करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणात कोणाचाही सहभाग असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी (Abdullah Khan Durrani) यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यात विविध ठिकाणी आठशेहून अधिक खत विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. तेथील ५१ हजार ८४४ नमुने तपासण्यात आले. याप्रकरणात ९६२ दावे दाखल करण्यात आले असून ७७ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तपासणीत ७६ परवाने रद्द करण्यात आले तर ५३ दुकानांना विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्यात या तपासणीत ६ कोटी ३३ लाख रुपयांचा बोगस खते, बी-बियाणे यांचा २ हजार ३६५ मेट्रीक टन साठा जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

परभणी येथे बोगस खत विक्री प्रकरणी संबंधीत गुजरातमधील कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात
आला असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. याशिवाय, जिल्ह्यात एकूण ७८ विक्रेत्यांची तपासणी
करण्यात आली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या ८ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही मंत्री सत्तार यांनी यावेळी दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) , सदस्य शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)
यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

Web Title :-  Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | Strict action against companies and vendors selling bogus fertilisers, seeds; FIR lodged in 77 police stations, 76 licenses cancelled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीसांना एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला घटनाक्रम (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट