Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti | ज्योतिष्यांना अंनिसचं खुलं आव्हान, लोकसभा निवडणुकीचं अचूक भविष्य सांगा आणि मिळवा 21 लाखांच बक्षीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti | बुवाबाबा, मुहूर्त, ज्योतिष (Astrologers) यांचा आधार बहुतांश राजकीय नेते घेताना दिसतात. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा बहुतांश उमेदवारांनी आपले अर्ज हे गुरूवारीच भरले आहेत. अशाच अंधश्रद्धांना उघडे पाडण्यासाठी अंनिसने एक आगळीवेगळी स्पर्धा राज्यातील ज्योतिषांसाठी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) अचूक भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला अंनिसने तब्बल २१ लाखांचे बक्षीस ठेवले आहे. या स्पर्धेच्या काही अटी आणि शर्तीदेखील आहेत.(Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti)

राज्यातील ज्योतिष्यांना अंनिसने खुले आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि २१ लाख रूपये जिंका, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना केले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या स्पर्धेसाठी प्रक्रिया आणि प्रश्नावली जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांसाठी नाही. यामध्ये फक्त ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांनाच सहभागी होता येणार आहे.

यासाठी पाच प्रश्न असणार आहेत. त्याची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी लागू आहेत.

अंनिसच्या स्पर्धेचे नियम आणि अटी

१. प्रवेशिका आणि उत्तरे तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र या नावे काढलेला रुपये ५००० (रुपये पाच हजार) प्रवेश शुल्काचा धनादेश (डी.डी.) सीलबंद पाकीटातून २५ मे २०२४ पर्यंत रजिस्टर पोष्टाने खालील पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे.

२. प्रवेशिका, प्रश्नावली आणि नियमावलीसाठी राहुल थोरात, व्यवस्थापकीय संपादक अंनिस वार्तापत्र, कार्तिक अपार्टमेंट, एफ- ४, सहारा चौक, संजयनगर, सांगली ४१६४१६. फोन नंबर- ०२३३-२३१२५१२ यांचेशी संपर्क करावा.

३. प्रवेशिका आणि प्रश्नावली मधील माहिती स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये अथवा टाईप केलेली असावी.

४. आव्हान प्रक्रियेसाठी निर्णय अधिकारी म्हणून तज्ज्ञ परीक्षक समिती कार्यरत असेल, परीक्षक समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

५. ज्योतिष आव्हान प्रक्रियेसाठीच्या बक्षीसाची रक्कम रुपये एकवीस लाख असेल.

६. एका व्यक्तीची एकच प्रवेशिका स्पर्धेसाठी पात्र असेल,

७. प्रश्नावली शंभर गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला पाच गुण असतील. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना ते उत्तर ज्योतिषाची कोणती पद्धत आणि कशी वापरून काढले याची सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. या माहितीसाठी अर्धे गुण असतील आणि अर्धे गुण उत्तरासाठी असतील.

८. संख्यात्मक अथवा टक्केवारीतील प्रश्नांसाठीच्या उत्तरामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक संख्या असतील तर आपले उत्तर ग्राहय धरले जाणार नाही. उदा. एखादया पक्षाला १०० ते १२० जागा मिळतील असे न लिहिता, अचूक आकडा ११२ असा लिहिलेला असावा.

९. निवडणुकीचे भविष्य वर्तवण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य सहभागी प्रवेशिकाकत्र्याने स्वतः उपलब्ध करावयाचे आहे.

१०. शंभर गुण मिळवणारा स्पर्धक बक्षीस पात्र असेल. एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी शंभर गुण संपादन केल्यास बक्षीसाची रक्कम समान प्रमाणात विभागून दिली जाईल.

११. आव्हान प्रक्रियेच्या संबंधातील आक्षेप, वाद व हरकतींचे न्यायालयीन कामकाज सांगली न्यायालयाच्या कार्यकक्षेत असेल.

१२. उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्यास उत्तर कोणत्या मतदारसंघाशी संबंधित आहे ते उमेदवाराच्या नावापुढे नमुद करावे अन्यथा आपली प्रश्नावली बाद ठरवण्यात येईल

१३. या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील निवडणूक निकाल आणि आकडेवारी ग्राहय धरण्यात येईल.

१४. भविष्य वर्तवण्यासाठी कोणती पध्दत वापरली, हे प्रवेशिकेत नमूद करणे आवश्यक आहे. अन्यथा आपली प्रश्नावली ग्रह्य धरण्यात येणार नाही.

१५. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केलेनंतर परीक्षक समितीच्या योग्य त्या तपासणीनंतर आव्हान प्रक्रियेचा निकाल दोन आठवडयात जाहीर करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

JM Road Firing Case Pune | पुण्यात बापानेच दिली मुलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सुपारी! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितली हकीकत, धक्कदायक कारण आलं समोर (Video)