राज्यात गाढवांची संख्या घटली : संरक्षण देण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी गाढवांच्या कमी होणाऱ्या संख्येवर उपाय म्हणून त्यांचे सरंक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गाढवांची संख्या कमालीची घटली आहे. हेच हेरुन मंत्री महादेव जानकर यांच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून, गाढवांच्या संरक्षणाचे आदेश दिले आहेत. राज्यातील गाढवांची संख्या सातत्याने कमी होत आहे आणि यावर वेळीच उपाययोजना न केल्यास गाढवं नामशेष होतील, अशी शक्यता आहे याशिवाय गाढवांचे अवयव, रक्त याचा वापर अवैधरित्या पशु खाद्यांमध्ये पूरक म्हणून वापरण्यात येतो. तसेच, गाढवांच्या कातडीचा वापर चिनी लोक कर्करोग आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी अवैधरित्या करतात, असे राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकात म्हटले आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी सक्त आदेश दिले आहेत आणि त्यांची तस्करी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कोणी कायद्याचं उल्लंघन करेन त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, याआधी राज्य शासनाने वाघांच्या सरंक्षणासाठी मोहीम हाती घेतली होती त्यानंतर आता गाढवांच्या सरंक्षणाचे मोहीम सुरु केली आहे.