‘सिमी’साठी काम करणाऱ्या दोन भावांच्या महाराष्ट्र ATS ने मुसक्या आवळल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र एटीएसने दोन भावांना अटक केली असून हे दोघे 2006 मधील एका प्रकरणात पाहिजे होते. या दोघांना मध्य प्रदेशातील बहानपुर आणि दिल्ली येथून अटक केली आहे. इजाज उर्फ अझीझ अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बंदी असलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली.


बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी ठाण्यात 2006 मध्ये बेकायदेशीर कृत्य अधिनियम 1967 अंतर्गत इजाजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 जुलै 2006 रोजी सिमी सघटनेसंबंधात नोंद झालेल्या गुन्ह्यात एजाज आणि इलियास हे फरार होते. हे दोघे मध्यप्रदेशातील बहानपुर आणि दिल्ली येथे असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसने दोघांना अटक करून मुंबईत आणले असून पुढील तपास सुरु आहे.

सिमी संघटनेवर 2001 पासून बंदी घालण्यात आली होती. 2006 मध्ये दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून नयानगर मिरारोड येथे धाड घातली असता एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकी याच्या घरी आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते. तसेच याच ठिकाणाहून बंदी असलेल्या सिमीचे देशविरोधी काम सुरु असल्याचे दिसून आले होते. यावरून 29 जुलै 2006 रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्यामध्ये बंदी असताना देखील आरोपी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी अब्दुस सुभान कुरेशी उर्फ तौकीर, सफदर नागौरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे त्यामध्ये इजाज शेख आणि इलीयास शेख या बंधूंचा समावेश होता. ते 2006 पासून कुर्ला येथून फरार होऊन ओळख लपवून वावरत होते. या गुन्ह्यात एहतेशाम सिद्दीकी याला 7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. तसेच 16 जुलै 2016 ला मुंबईत 7 ठिकाणी झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/