राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी ‘या’ कारणामुळे घातला बहिष्कार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज सोमवारी सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांनी आपण आरएसएसचा स्वयंसेवक असल्याच्या केलेल्या उल्लेखावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच सरकारच्या अपयशावर बोट ठेवत विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे.

भाजप-शिवसेना सत्तेत आल्या पासून आज पहिल्यांदाच विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर वरून आपण राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालत असल्याचे अधिकृतपणे जाहीर देखील केले आहे.

नोटाबंदीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या संजय काकडेंचे आता काय मत आहे वाचा 

‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधी मंडळ आवारात सरकारवर हल्ला चढवला. सहा दिवस अधिवेशनाचा कालावधी असून शेतकऱ्यांची कर्जमाफी, नोकर भरती, दुष्काळ आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर सरकारला घेण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रविवारी आयोजित केलेल्या चहा पानावर देखील विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.